Student Protest Ahilyanagar | सोनम वांगचुक प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी 20 रोजी अहिल्यानगरात 'शांतता मार्च'; विद्यार्थी, शिक्षक, पालकांना सहभागाचे आवाहन - Rayat SamacharStudent Protest Ahilyanagar सोनम वांगचुक प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी अहिल्यानगरात शांतता मार्च

Student Protest Ahilyanagar | सोनम वांगचुक प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी 20 रोजी अहिल्यानगरात ‘शांतता मार्च’; विद्यार्थी, शिक्षक, पालकांना सहभागाचे आवाहन

पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, मागणी

rayatsamachar
2 Min Read

अहमदनगर | १९.७ | रयत समाचार

(Student Protest Ahilyanagar) दिल्ली येथे पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते तथा शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेतील वाढत्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ता.२० जुलै अहिल्यानगर शहरात ‘शांतता मार्च’चे आयोजन करण्यात आले.

(Student Protest Ahilyanagar) जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी संघटना, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे ही पहा : Protest | अहिल्यानगरमधील सोनम वांगचुक समर्थनार्थ निघालेला पहिला मोर्चा Live पहा 

(Student Protest Ahilyanagar) आयोजकांच्या निवेदनानुसार, देशभरात स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, निकालातील विलंब, शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी आणि वाढती बेरोजगारी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली.

हे ही पहा : History | युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आयोजकांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनांकडे केवळ कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने न पाहता त्यांच्या न्याय्य मागण्यांवर पारदर्शक आणि वेळेत निर्णय घेणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर एकजूट निर्माण करण्याची गरज असून सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी आणि न्यायप्रिय नागरिकांनी या आंदोलनाला नैतिक व प्रत्यक्ष पाठिंबा द्यावा.

मार्च सोमवारी २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता महात्माफुले पुतळा (माळीवाडा) येथून सुरू होऊन कापडबाजार, चितळे रोड आणि दिल्लीगेट मार्गे काढण्यात येणार आहे.

sonam-wangchuk-student-protest-ahilyanagar-shantata-march-ahilyanagarया आंदोलनाचे आयोजन सर्व पुरोगामी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि न्यायप्रिय लोकशाहीवादी नागरिक, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 9403317106, 9922044213, 7620755862 आणि 7743851483 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Tukaram Abhang | संतवाणी : ‘संतां नाहीं मान’ तुकोबांच्या अभंगाचा खरा अर्थ !


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading