Press | दर्शकच बना निर्माते; ‘इंडी जर्नल’चे आवाहन

संवेदनशील प्रकल्प उघडकीस आणण्यासाठी सहभागाचे स्वागत

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath
Highlights

पुणे | २९.३ | रयत समाचार

(Press) सह्याद्रीच्या कुशीत उभारल्या जाणाऱ्या वादग्रस्त प्रकल्पांचे वास्तव समोर आणण्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेचा नवा प्रयोग ‘दर्शक निर्माता’ संकल्पनेतून पुढे येत आहे. ‘इंडी जर्नल’चे प्रथमेश पाटील यांनी या उपक्रमाद्वारे जागरूक नागरिकांना थेट वार्तांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(Press) तारळी (जि. सातारा) येथील महाप्रकल्पावर प्रकाश टाकताना या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी झाली होती. आता पुन्हा एकदा सह्याद्रीतील अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकल्पावर सखोल वार्तांकन करण्याची तयारी सुरू आहे.

(Press) प्रथमेश पाटील म्हणाले, जे दर्शक या वार्तांकनासाठी किमान ₹२००० किंवा त्याहून अधिक आर्थिक योगदान देतील, त्यांना ‘दर्शक निर्माता’ म्हणून निर्मिती श्रेय देण्यात येईल. ही केवळ आर्थिक मदत नसून, स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारितेला दिलेला पाठिंबा आहे.
या उपक्रमासाठी रविवार, २९ मार्चपर्यंत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी UPI द्वारे QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकवर (bit.ly/SupportIndieJournal) जाऊन आपला सहभाग नोंदवावा.
Press
जाहिराती न स्वीकारण्याच्या धोरणामुळे ‘इंडी जर्नल’ला अशा लोकसहभागातूनच खर्च भागवावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिलेला सहयोग नॉन-रिफंडेबल असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
या नव्या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना पत्रकारितेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत असून, संवेदनशील विषयांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading