नवी दिल्ली | २०.७ | रयत समाचार
(Sonam Wangchuk Protest) पर्यावरणवादी, शिक्षण सुधारणा कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी उपोषणाच्या २० व्या दिवशी देशवासीयांना एक भावनिक संदेश पाठवत ‘भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी व्हा’ असे आवाहन केले आहे. त्यांनी २० जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
(Sonam Wangchuk Protest) वांगचुक यांनी आपल्या हस्तलिखित संदेशात ‘आज़ादी का दूसरा आन्दोलन- भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत’ अशी घोषणा दिली. त्यांनी देशात घडणाऱ्या नीटसारख्या पेपरफुटीच्या घटना, अन्याय आणि भीतीचे वातावरण यांचा उल्लेख करत Freedom from Injustice आणि Freedom from Fear ही आंदोलनाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे नमूद केले आहे.
(Sonam Wangchuk Protest) संदेशात त्यांनी India’s 2nd Freedom Movement – March to the Parliament. Please make it a big success असे लिहून संसद मार्च यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. हा संदेश त्यांनी गीतांजली यांच्या माध्यमातून सफदरजंग येथील आपल्या कथित बेकायदेशीर नजरकैदेतून पाठविल्याचा दावा केला.
यापूर्वी उपोषणाच्या २० व्या दिवशी वांगचुक यांनी ‘२० जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मी जिवंत राहीन’ असे भावनिक वक्तव्य केले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
हे ही पहा : History | युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन
२० जुलै रोजी दिल्लीतील संसद मार्चकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे विशेष लक्ष राहणार आहे.
History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



