नगर तालुका | प्रतिनिधी
Chandbibi Mahal भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या जगप्रसिद्ध सलाबतखान कबर म्हणजेच चांदबीबी महालावर मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे वाजवून वाढदिवस साजरा करत ऐतिहासिक वास्तूचा गैरवाजवी वापर केल्याप्रकरणी मोहन लुल्ला यांच्यासह ३० ते ४० जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भारतीय पुरातत्व विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी असलेल्या संरक्षक सहायक ASI एस.एन. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष अंबादास महाजन यांनी फिर्याद दिली. यामध्ये म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग यांच्या अंतर्गत राष्ट्रीय संरक्षित पुरातत्व वास्तू असलेल्या चाँदबीबी महाल या वास्तूत पुरातत्व विभागाची कुठलीही परवानगी न घेत ३० ते ४० जणांनी मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे वाजवत मोहन लुल्ला यांचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या संरक्षित वास्तूचा गैरवाजवी वापर झाला आहे.
या फिर्यादी वरून पोलिसांनी मोहन लुल्ला यांच्यासह ३० ते ४० जणांवर पुरातत्वीय स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ चे कलम ३० (१) सह भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधे शंभरापेक्षा अधिक लोक सहभागी होऊन संरक्षित वास्तूजवळ मोठ्याने आवाज करत धांगडधिंगा घालताना दिसत असून फक्त ३०/४० जणांवर गुन्हा दाखल करणे संशयास्पद असल्याची शहरात चर्चा आहे.
संबंधित बातमी वाचा : सलाबतखानाला सुनावले, मैं हूँ डॉन; चांदबिबी महालावर “बडी सॉलिड मस्ती छायी”; पुरातत्व विभाग कुंभकर्णी झोपेत
हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी