अहमदनगर | भैरवनाथ वाकळे
Citizen Forum: जगप्रसिध्द कैरो व बगदाद शहराच्या तोडीच्या असलेल्या ऐतिहासिक Ahmednagar शहराची झालेली भौतिक व सामाजिक दैन्यावस्था संपवून शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जाणते नगरकर सरसावल्याचे आज सिध्द झाले. माजी Chancellor डॉ.सर्जेराव निमसे, Arch. अर्शद शेख व सुवर्णम् Prideचे संचालक एन.बी.धुमाळ यांच्या पुढाकाराने शॉर्टनोटीसवर १४५ जाणते नगरकर आज संध्याकाळी एकत्र आले. शहरविकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी विचारमंथन केले. प्रश्नांचा उहापोह केला. त्यांच्या नोंदी घेतल्या आणि आता ते कसे कसे सोडवायचे याचे नियोजन सुरू करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
विशेष निमंत्रितांसाठी ही Metting आयोजित करण्यात आली होती. तरीही डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, समाजसेवक, वकील, प्राध्यापक, हवामानतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील १४५ जाणते नगरकर सहभागी झाले होते. सध्या घडत असलेल्या अहमदनगर शहरातील व राज्यातील अनेक घटनांबद्दल संवेदनशील व जबाबदार नागरिक विचलित झाले आहेत. Amc महानगरपालिकेमधील सर्वोच्च व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी व नागरी सुविधा याबद्दल नागरिकात तीव्र नाराजी आहे. अहमदनगर शहराच्या नामांतराबद्दल एकमत नाही. तसेच कायदेशीरपणाबद्दल शाशंकता आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील Non Political मान्यवर, बुद्धिमत्तांसाठी संध्याकाळी ६ ते ८ यादरम्यान ‘हॉटेल सुवर्णम प्राइड‘ तारकपूर बस स्टॅन्डसमोर येथे सुज्ञ नागरिकांशी चर्चा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मर्यादित लोकांनाच बोलवले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी Padmashri पोपट पवार हे असणार होते परंतु ते येवू शकले नाही. त्यामुळे L&T कंपनीचे प्रमुख अरविंद पारगावकर हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शन नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.
बैठकीचे सविस्तर प्रास्ताविक उद्योजक, वक्ता, लेखक तथा सुवर्णम् प्राईडचे संचालक एन. बी. धुमाळ यांनी केले. बैठकीची सविस्तर भुमिका त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडून सर्वांचे स्वागत केले. ऊर्जिता फौंडेशनच्या संध्या मेढे, बांधकाम व्यवसायिक जवाहर मुथा, डॉ. प्रकाश कांकरीया, आर्कि. अर्शद शेख, भ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक सब्बन, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, पत्रकार भुषण देशमुख, अरविंद पारगावकर, प्रमोद कांबळे, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. मिश्रा, प्रकाश गांधी, सुहासभाई मुळे, बी.एन शिंदे, इंजी.आर्कि असो. अध्यक्ष, लोकमतचे सुधीर लंके आदींनी आपापल्या भुमिका मांडून अहमदनगर शहराच्या बदलासाठी आता रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल हे अभिवचन दिले. बैठकीस सहभागी सर्वांना अल्पोपहारासह एन.बी.शिंदे यांचा ‘यशाचे १११ मंत्र‘ हे छोटेखानी पुस्तक भेट देण्यात आले.
सर्व उपस्थितांचा व्हॉट्सअप गृप करून लवकरच पुढील दिशा ठरणार असल्याचे डॉ.सर्जेराव निमसे व एन.बी.शिंदे यांनी सांगितले.
Blum – available to everyone
THE TIME HAS COME! Confirm your TON Wallet and receive $BP Token. Get the giveaway
Visit our project website http://www.notreward.pro , log in with your wallet and receive tokens!
Your personal promo code to receive Airdrop – gf40jy
Good luck