श्रीगोंदा | २० नोव्हेंबर | माधव बनसुडे
Agriculture सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ सुवर्णमहोत्सवी ५० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गाळप हंगाम शुभारंभ गुरुवारी ता. २१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी दिली.
माहिती देताना शिंदे यांनी म्हटले, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन २०२४-२५ चा पन्नासावा गळीत हंगाम सुरू होत आहे. हा एक ऐतिहासिक सुवर्णमहोत्सवी गळीत हंगाम असून गुरुवारी ता.२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्माननीय संचालक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ व गाळप हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी बॉयलरची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके व मीनाक्षीताई नेटके, संचालक सावता हिरवे व अरुणा हिरवे यांचे हस्ते होणार. गव्हाण पूजन संचालक बंडूतात्या जगताप व अल्पना जगताप तर काटा पूजन संचालक विठ्ठल बापू जंगले व कल्पना जंगले यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा