शेवगाव | २० नोव्हेंबर | लक्ष्मण मडके
Election तालुक्यातील ठाकूर निमगाव बूथ नं. १२६ या मतदान केंद्रावर अन्नदाता बळीराजा असलेले शेतकरी दांपत्य असलेल्या सुखदेव भगत व कमलबाई भगत यांनी थेट बैलगाडीतून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या राष्ट्रकर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकीकडे शहरी शिक्षितवर्ग मतदानाकडे दूर्लक्ष करत असल्याचे चित्र होते. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन हा वर्ग ट्रिपला, सहलीला जात होता. मतदानाकडे दूर्लक्ष करत होता. त्यासाठी शासनाने १००% मतदान करण्यासाठी जागृती मोहिम सुरू केली. तर दुसरीकडे कष्टकरी असलेला देशाचा अन्नदाता भारतीय राज्यघटना वाचविण्यासाठी आपल्या महत्वाच्या कामातून वेळ काढून लोकशाही हक्क असलेल्या मतदानास सहकुटुंब येत आहे. हे आशादायक चित्र असून शहरी सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा