बेळगाव | ५ फेब्रुवारी | श्रीकांत काकतीकर
(india news) बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर महिलांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले आणि गेली पन्नास वर्षे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासह मंदिराचे कार्य अत्यंत प्रभावीपणे चालविले आहे. या मंदिराचा सुवर्ण महोत्सवी वर्षाला मंगळवारी ता.११ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
(india news) बेळगाव शहर आणि परिसरात अनेक मंदिरे आहेत. यामध्येही हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर हिंदवाडी महिला मंडळाच्या महिला भगिनींनी उभारलेले आहे. श्री महालक्ष्मीचे सुरेख मंदिर, महालक्ष्मी देवीचे मनमोहक मूर्ती, सभा मंडप, प्रशस्त हॉल त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे बेळगावच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रात या मंदिराने मोलाची भर घातली.
महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष प्रारंभ आणि वर्धापन दिन औचित्य साधून मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी अभिषेक, अलंकार आणि गणपतीपूजा, पुण्यह वाचन, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हृदय पारायण, श्रीसुक्त होम, महालक्ष्मी मूलमंत्र होम, पूर्णाहूती, महामंगलारती करण्यात येणार. त्यानंतर दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार.
(india news) हिंदवाडी महालक्ष्मी मंदिर सुवर्ण महोत्सवाची वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून भाविकांसाठी या शुभ सोहळ्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभरातील दर शुक्रवारी मंदिरात पूजाविधी करण्यात येणार आहेत. श्रीयंत्र अभिषेक ललिता सहस्त्रनाम विधी केवळ महिलांसाठी आहेत. प्रसाद वाटप, साडी अर्पण, चांदीची सजावट, फुलांची सजावट, चंदन अलंकार, लोणी पूजा, हळदीची पूजा, गर्भगुढी अभिषेक आधीही संपन्न होणार आहेत. यामध्ये सहभागी होणारे भाविकांनी संपर्कासाठी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सावंत 9448282377, भारती किल्लेकर 8762189363, पुजारी मारुती भट 9731916917 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी