Teachers Day: भवानी माता विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका - Rayat Samachar

Teachers Day: भवानी माता विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका

फुलांची उधळण करत गुरूंप्रती व्यक्त केली कृतज्ञता

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

पाथर्डी | पंकज गुंदेचा

Teachers Day: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीमानूर येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत एक दिवस विद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता अनोख्या पद्धतीने व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. देविदास सोनटक्के होते. इयत्ता दहावीतील कु. गाडे राजनंदिनी हिने मुख्याध्यापकाची, तर कु. नागरे समृद्धी हिने पर्यवेक्षकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत शाळेतील विविध जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षकांचा सन्मान करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून आपल्या गुरूंप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisement -

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. प्रविण गावडे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जीवनात वेळेचे नियोजन आणि वेळेचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Teachers Day

श्री. कैलास वाघ यांनी आपल्या मनोगतात जीवनातील गुरुचे स्थान, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि शिस्तीचे महत्त्व स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्री. देविदास सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात गुरुजनांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी कायम लक्षात ठेवून त्यांचे आचरण करावे, असे सांगितले. गुरुंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे असते, असेही त्यांनी नमूद केले.

इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री. समीर नरसाळे यांनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तसेच विविध जबाबदाऱ्या उत्स्फूर्तपणे पार पाडत शिक्षकांच्या भूमिकेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. झेंड अनुष्का हिने, तर आभारप्रदर्शन कु. ढाकणे प्रतीक्षा हिने केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त घेतलेला पुढाकार आणि आपल्या शिक्षकांचा केलेला सन्मान हा विद्यालयातील गुरु-शिष्य नात्याची सुंदर अनुभूती देणारा ठरला.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading