Film Festival Selection: ‘Dindi | Way Of Life’ची International Tagore Film Awards 2026 मध्ये Official Selection

Film Festival Selection | ‘अगस्ती ऋषी दिंडी’ची स्टोरी थेट कोलकात्याच्या आंतरराष्ट्रीय मंचावर; ‘दिंडी | Way of Life’ची International Tagore Film Awards 2026 मध्ये अधिकृत निवड

भैरवनाथ वाकळे यांच्या लघुपटाला मानाचे स्थान; अकोलेतील वारकरी बंधू-भगिनींसह सहकाऱ्यांचे विशेष आभार

rayatsamachar
4 Min Read
अकोलेच्या अगस्ती ऋषी दिंडीवर आधारित ‘Dindi | Way of Life’ लघुपटाची International Tagore Film Awards 2026 साठी Official Selection झाली आहे.

अहिल्यानगर | ०३.९ | रयत समाचार

(Film Festival Selection) जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती ऋषी दिंडी सोहळ्याचे जीवन, संस्कृती, माणूस आणि निसर्गाशी असलेले नाते चित्रबद्ध करणाऱ्या ‘Dindi | Way of Life’ या निरिक्षणप्रधान लघुपटाची International Tagore Film Awards 2026 साठी Official Selection झाली आहे, अशी माहिती ‘नगरी नगरी’चे किरण डहाळे यांनी दिली.

(Film Festival Selection) कोलकता, भारत येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत निवडीत लघुपटाने स्थान मिळवल्याने अकोलेच्या ‘अगस्ती ऋषी दिंडी’ सोहळ्याची आणि अहिल्यानगरच्या सांस्कृतिक जीवनाची आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वात दखल घेतली गेली.

रयत चित्र फिल्म्स निर्मित या लघुपटाचे दिग्दर्शन भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केले असून किरण दत्तराज डहाळे यांनी आवाज दिला आहे.

(Film Festival Selection) International Tagore Film Awardsच्या स्क्रिनिंग कमिटीने लघुपटाचे परीक्षण केल्यानंतर त्याची २०२६च्या Official Selectionमध्ये निवड केली. या निवडीनंतर आता ‘Dindi | Way of Life’ अंतिम ज्युरी परीक्षणाच्या फेरीत दाखल झाला असून विविध पात्र श्रेणींमध्ये नामांकन आणि पुरस्कारासाठी तो इतर Officially Selected चित्रपटांशी स्पर्धा करणार आहे.
फेस्टिव्हलच्या माहितीनुसार, विशेष कलात्मक गुणवत्ता आढळल्यास ज्युरीला एखाद्या Officially Selected चित्रपटाची नामांकनाच्या टप्प्याशिवाय थेट Winners Listमध्ये निवड करण्याचा अधिकारही आहे. मात्र Official Selection ही पुरस्कार किंवा नामांकनाची हमी नसून अंतिम निर्णय ज्युरीचा असेल.
‘दिंडी’ म्हणजे केवळ चित्रपट नव्हे : Dindi | Way of Life हा केवळ एखाद्या धार्मिक सांस्कृतिक सोहळ्याचे चित्रण करणारा लघुपट नसून माणूस, निसर्ग आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीकडे नव्याने पाहण्याचा प्रयत्न आहे. अकोलेच्या अगस्ती ऋषी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी समाजाचे जीवन, त्यातील सामूहिकता, श्रद्धा, परंपरा आणि माणुसकीचे विविध पैलू चित्रभाषेतून मांडण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या अकोले येथील सर्व वारकरी बंधू-भगिनींचे विशेष योगदान राहिले आहे. त्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळेच हा अनुभव चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला. त्यामुळे अगस्ती ऋषी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक विशेष आभार, अशी भावना दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे यांनी व्यक्त केली.
अनेक सहकाऱ्यांच्या योगदानातून ‘दिंडी’ची निर्मिती : लघुपटाच्या निर्मितीप्रक्रियेत विविध स्तरांवर सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही मोठा वाटा आहे. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सॅम्युअल वाघमारे, निहाल घोडके, संध्या मेढे, उज्ज्वला वाकळे, सायली तोरणे, तुषार सोनवणे, दिपक शिरसाठ, पंकज गुंदेचा, मरयम सय्यद, संतोष गायकवाड, विजय केदारे, अतुल देठे, समृद्धी वाकळे, समीक्षा वाकळे, नवनाथ मगर, एस्थर, रूतूजा शिंदे, इमान्युअल आणि जोस यांचे या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
या सर्व सहकाऱ्यांचे तसेच चित्रपटाच्या निर्मितीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानताना, Dindi | Way of Life ही एका व्यक्तीची नव्हे तर अनेकांच्या सहभागातून आकाराला आलेली कलाकृती आहे, असे वाकळे यांनी नमूद केले.
Official Selectionनंतर Video Byteही सादर : International Tagore Film Awardsकडून Official Selectionनंतर लघुपटाच्या निर्मात्याकडून ३० ते ६० सेकंदांचा Video Byte मागविण्यात आला होता. त्यानुसार भैरवनाथ वाकळे यांनी आपला संदेश व्हिडिओच्या माध्यमातून Festivalकडे सादर केला.
या संदेशात त्यांनी Official Selectionबद्दल आनंद व्यक्त करताना, मानवी दृष्टीकोन समोर ठेवा, आपली गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, प्रयोग करण्यास घाबरू नका आणि आपल्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवा, असा संदेश जगभरातील चित्रपट निर्माते यांना दिला.
अकोल्यापासून कोलकात्यापर्यंतचा प्रवास : अहिल्यानगर शहराच्या रस्त्यांवर, वारकरी बंधू-भगिनींच्या सहभागातून आणि अगस्ती ऋषी दिंडीच्या अनुभवातून जन्मलेली ही कथा आता कोलकात्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या अंतिम ज्युरीपर्यंत पोहोचली आहे.
‘Dindi | Way of Life’ची Official Selection ही अकोलेच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि त्या परंपरेला जिवंत ठेवणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींच्या सहभागाचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
रयत चित्र फिल्म्सच्या माध्यमातून या लघुपटाचा आंतरराष्ट्रीय प्रवास पुढे सुरू असून आता सर्वांचे लक्ष International Tagore Film Awards 2026च्या अंतिम ज्युरीच्या निर्णयाकडे लागले आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading