अहमदनगर | प्रतिनिधी
Ashadhi Ekadashi किड्स सेकंड होम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात ahmednagar मधील बोल्हेगाव उपनगरातून दिंडी काढून स्वच्छतेचा संदेश दिला. ही दिंडी विविध भागातून मार्गक्रमण करताना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना यावेळी स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. “ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा” या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठलनामाच्या जय घोषात, टाळ- मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली होती. दिंडीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळसी घेऊन सहभागी झाल्या होत्या.
भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकर्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.
संस्थाध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करुन या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आा. यावेळी सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले, कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे, मुख्याध्यापिका
व शिक्षकवृंद आदी उपस्थिती होते.
परिसरातील vitthal मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. गांधीचौक येथून मार्गक्रमण करत गणेशनगर, बोल्हेगाव असे फिरून शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांची दिंडी पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.