अहमदनगर | प्रतिनिधी
बडोदा महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ता. २० जुलै १९०८ रोजी स्थापन केलेल्या BOB बँक ऑफ बडोदाच्या स्थापनादिनानिमित्त RSS Politics भाजपाचे ज्येष्ठ नेते व इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच SNDT चे संस्थापक अध्यक्ष विनायक देशमुख व संचालिका पुजा देशमुख यांनी शहरातील बँक बडोदाच्या मुख्यशाखेत मुख्य व्यवस्थापक दिलिप ढोबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
१९८२ पासुन म्हणजे मागील ४२ वर्षांपासून मी बँक ऑफ बडोदाचा ग्राहक असुन त्याचा मला अभिमान वाटतो, अशी भावना यावेळी देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी व्यवस्थापक भुषण कुलकर्णी, विक्रम कोथिंबिरे व अन्य कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.