Education | डॉ. प्रियंका यांची जनरल सर्जरीसाठी निवड; शिंदे कुटुंबाचा अभिमानास्पद क्षण

रयत समाचार वृत्तसेवा
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १.३ | रयत समाचार

(Education) येथील प्रसिध्द ‘स्वप्नपूर्ती इन्फ्रा’चे इंजि. भारत शिंदे यांची कन्या डॉ. प्रियंका शिंदे (MBBS) हिने वैद्यकीयक्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत पदव्युत्तर शिक्षणासाठी General Surgery या शाखेत प्रवेश मिळवला आहे. नाशिक येथील नामांकित डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (Dr. Vasantrao Pawar Medical College & Hospital) येथे तिची निवड झाल्याने शिंदे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.Education

(Education) डॉ. प्रियंका शिंदे यांनी एमबीबीएस पदवी उत्कृष्ट गुणांसह पूर्ण करत वैद्यकीय क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली. आता जनरल सर्जरीसारख्या आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेच्या शाखेत प्रवेश मिळवून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठली आहे. रुग्णसेवा आणि शस्त्रक्रिया क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवण्याचा त्यांचा संकल्प असून, भविष्यात कुशल सर्जन म्हणून समाजसेवा करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

(Education) डॉ. प्रियंका या प्रसिद्ध डिझायनर ज्ञानेश शिंदे यांच्या पुतणी असून, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात शिंदे कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याचे कार्य त्या करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.Education

डॉ. प्रियंका शिंदे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उंचावले असून, तरुणाईसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading