Education | विज्ञान जीवनाला दिशा देते- प्रमोद तोरणे; राष्ट्रीय विज्ञानदिन उत्साहात साजरा

रयत समाचार वृत्तसेवा
SubEditor | Dipak Shirasath

भिंगार | १.३ | रयत समाचार

(Education) मानवी जीवनात विज्ञानाने क्रांतिकारक बदल घडवून जीवन अधिक सुकर केले आहे. मात्र, या बदलामागे आयुष्य वेचणाऱ्या संशोधकांचे स्मरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक भारतीयाने विज्ञानाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले.

(Education) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट शैक्षणिक संकुल येथे ता.२८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय शास्त्रज्ञ सी.व्हि. रमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

(Education) कार्यक्रमास उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुळे, पर्यवेक्षिका कविता शिंदे, प्राध्यापक पठाण, विद्यार्थी-पालक वाघमारे, उपशिक्षक देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित गीत व नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विज्ञान दिनाचे महत्त्व आणि आधुनिक विज्ञानातील प्रगती यावर गणपत करवते यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञानामुळे मानवी जीवन कसे सुसह्य झाले आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी वैशाली दांदळे यांनी विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी या प्रयोगांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाडळे यांनी केले, तर क्रांती घायतडक यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, शोधक वृत्ती आणि विज्ञानाविषयीची आवड वाढीस लागली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading