BarristerBarrister: डॉ.आंबेडकरांचे कर्नाटकातील पहिले अनुयायी होते देवराय इंगळे - डॉ.संभाजी बिरांजे    - Rayat Samachar

Barrister: डॉ.आंबेडकरांचे कर्नाटकातील पहिले अनुयायी होते देवराय इंगळे – डॉ.संभाजी बिरांजे   

रयत समाचार वृत्तसेवा
19 / 100

सांगली | प्रतिनिधी

कर्नाटकात सामाजिक सुधारणा घडवून तेथील बहिष्कृतांना आंबेडकरकृत मानवमुक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे देवराय इंगळे हे त्यांचे Barrister डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटकातील पहिले अनुयायी होत, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.संभाजी बिरांजे यांनी व्यक्त केले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त जत तालुक्यातील गुगवाड येथील बौद्धविहारात त्यांच्या ‘आंबेडकरवादी – देवराय इंगळे’ या चरित्राचे प्रकाशन झाले, यावेळी बिरांजे बोलत होते. अध्यक्षस्थानी अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योगपती सी.आर.सांगलीकर होते.

 

डॉ. बिरांजे पुढे म्हणाले की, आंबेडकरवादी देवराय इंगळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या अनेक लढ्यांचे जसे कृतीशील समर्थन केले होते, तसे त्यांनी देवदासी निर्मूलनासाठी अनेक नाटके लिहून स्त्रीमुक्ती चळवळीला शासकीय पातळीवरून न्याय मिळवून दिला. डाॅ.आंबेडकरांच्या सूचनेनुसार बहिष्कृत मुलांसाठी उभा केलेले वसतीगृह हे आंबेडकरांचे कर्नाटक येथील पहिले स्मारक होय. आंबेडकर यांचे शैक्षणीक धोरण राबविणाऱ्या देवरायांनी माने आडनावाच्या नावाच्या तरुणाला बॅरिस्टर केले. हा तरुण कर्नाटक राज्यातील पहीला बॅरिस्टर होय.

 

VIRAJ TRAVELS
Ad image

सी.आर.सांगलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, १९३६ साली शासनाला देवदासी निर्मूलन कायदा करण्यासाठी भाग पाडणारे आणि त्याद्वारे स्त्री उध्दर कार्याची चळवळ गतिमान करणारे देवराय इंगळे हे आंबेडकरी चळवळीतील मोठे सुधारक होते. त्यांचे चरित्र हे पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे असून त्यांचे कार्य सामान्यापर्यंत जाण्यासाठी डॉ. बिरांजे यांनी देवरायांचे लिहिलेले चरित्र आंबेडकरी चळवळीत मैलाचा दगड ठरेल.

 

याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ॲड. भरत शिंदे, भंते यश काश्यपायन यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. बौध्द पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, अणि आंध्रप्रदेशाच्या भागातून जवळपास अठरा ते वीस हजार लोक तथागत भगवान बुद्धाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शनेनिदर्शने

हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी

Share This Article
Leave a comment