Muslim: अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत पक्षाने ठोस भूमिका घ्यावी - अथर खान; शरदचंद्र पवार यांच्याकडे अल्पसंख्यांक विभागाची मागणी - Rayat Samachar
Ad image

Muslim: अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत पक्षाने ठोस भूमिका घ्यावी – अथर खान; शरदचंद्र पवार यांच्याकडे अल्पसंख्यांक विभागाची मागणी

19 / 100

अहमदनगर | प्रतिनिधी

येथील राष्ट्रवादी काँग्रेस Muslim अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अथर खान व अल्पसंख्यांक पदाधिकारी यांनी शरदचंद्र पवार व खा. सुप्रिया सुळे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर परिसरातील अल्पसंख्यांक Muslim समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारावर व धार्मिकस्थळावर झालेल्या हल्ल्याबाबत पक्षाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली तसे पत्र देण्यात आले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

मागणीत म्हटले की, ज्या समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला अशा समाजविघातक लोकांना कडक शासन होऊन अल्पसंख्यांक Muslim समाजाला न्याय मिळवून द्या. अपराध्यांना कडक शिक्षा होण्यासाठी विधानसभेत व लोकसभेत मागणी करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यावेळी अल्पसंख्यांक Muslim जिल्हाध्यक्ष अथर खान, प्रदेश सचिव फारूक रंगरेज, जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रदेश युवकाध्यक्ष महबूब शेख, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी  सर्जेराव निमसे, नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, माजी महापौर अभिषेक कळमकर, किसनराव लोटके, बाळासाहेब हराळ, सिताराम काकडे, सरचिटणीस आरिफ पटेल, फैय्याज तांबोळी, तालुका कार्याध्यक्ष मोहसिन पठाण, सचिव दिलावर मेजर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पक्षाच्या वतीने खासदार शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत घटनेचे निषेध व्यक्त केला. अल्पसंख्यांक समाजाबरोबर पक्ष खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन दिले व समाजविघातक प्रवृत्तींना कडक शासन होणार असल्याची भावना व्यक्त केली.

हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment