Uddhav Thackeray Press Conference | एल्गार ; उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद; संजय राऊत यांची माहिती - Rayat Samachar

Uddhav Thackeray Press Conference | एल्गार ; उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद; संजय राऊत यांची माहिती

महत्त्वाची भूमिका मांडणार

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
३ जुलै रोजी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत यांनी दिलीSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २.७ | रयत समाचार

(Uddhav Thackeray Press Conference) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शुक्रवारी ता.३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दिली असून, “एल्गार!” या एका शब्दात त्यांनी या पत्रकार परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.

हे ही वाचा : India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?

(Uddhav Thackeray Press Conference) राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शिवसेनेची पुढील राजकीय रणनीती तसेच विविध समकालीन विषयांवर उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Uddhav Thackeray Press Conference) अलीकडील राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात असून, उद्धव ठाकरे कोणते मुद्दे उपस्थित करतात याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.
शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता असून, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading