Crime | डरपोक (गांडू)! ऑपरेशन 'तुडवा' इफेक्ट; संजय राऊतांची पोस्ट चर्चेत; गुप्तचर विभागाच्या पत्रासह साधला निशाणा - Rayat Samachar

Crime | डरपोक (गांडू)! ऑपरेशन ‘तुडवा’ इफेक्ट; संजय राऊतांची पोस्ट चर्चेत; गुप्तचर विभागाच्या पत्रासह साधला निशाणा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १८.६ | रयत समाचार

(Crime) मुळशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असलेल्या पक्षाचे राज्यसभा खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

(Crime) संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या (State Intelligence Department) कथित वायरलेस संदेशाचे छायाचित्र शेअर करत, ‘डरपोक (गांडू)! ऑपरेशन ‘तुडवा’ इफेक्ट. जय महाराष्ट्र!’ अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

(Crime) पोस्टमध्ये जोडलेल्या पत्रानुसार, अलीकडील संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर काही खासदारांना तात्काळ ‘Y+’ दर्जाच्या स्थानिक सुरक्षा व्यवस्थेच्या समतुल्य सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे दिसून येते. या यादीत यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, मुंबई उत्तर-पूर्वचे संजय पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे.
या पत्राच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ‘ऑपरेशन तुडवा’चा उल्लेख करत सरकारवर आणि यंत्रणांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, राऊत यांनी उल्लेख केलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ संदर्भात अधिकृत स्तरावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या पत्राची अधिकृतरीत्या स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या पत्राची सत्यता आणि त्यामागील पार्श्वभूमीबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading