Ahilyanagar Bougainvillea Plantation | नगरच्या सौंदर्यात नवा रंग; गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून टिळकरोडवर 1,000 बोगनवेलींची लागवड - Rayat Samacharअहमदनगरमध्ये 1,000 बोगनवेलींची लागवड; Ahilyanagar Bougainvillea Plantation लोकसहभाग

Ahilyanagar Bougainvillea Plantation | नगरच्या सौंदर्यात नवा रंग; गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून टिळकरोडवर 1,000 बोगनवेलींची लागवड

लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही; आमदार जगताप यांचे प्रतिपादन

rayatsamachar
2 Min Read
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते टिळक रोडवरील 1,000 बोगनवेली लागवड उपक्रमाचा आरंभSubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १८.७ | रयत समाचार

(Ahilyanagar Bougainvillea Plantation) अहिल्यानगर शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि आकर्षक बनविण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क परिसरातील टिळक रोडवरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून तब्बल 1,000 बोगनवेलींची लागवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र तथा गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आगामी काळात विविध रंगांच्या बोगनवेलींच्या फुलांनी टिळकरोड परिसर नटणार असून शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे.

हे ही पहा : युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन

(Ahilyanagar Bougainvillea Plantation) या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, लोकसहभागाशिवाय कोणतीही सामाजिक चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. शहर सुंदर, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नागरिकांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

(Ahilyanagar Bougainvillea Plantation) गोरख पडोळे यांनी शहर सुशोभीकरणासाठी नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. बोगनवेलींची देखभाल करून त्यांचे संवर्धन करण्यासाठीही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अहमदनगरच्या टिळक रोडवर गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून 1000 Ahilyanagar Bougainvillea Plantation शुभारंभ
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते टिळक रोडवरील 1,000 बोगनवेली लागवड उपक्रमाचा आरंभ
यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, दत्ता गाडळकर, संजय कडूस, कांतीसेठ पटेल, तुषार मुथा, परेश दिवाणी, जेठासेठ पटेल, पुरुषोत्तम पटेल, हंसराज पटेल, निलेश पटेल, नरसीभाई पटेल, जगदीश पटेल, लालाशेठ पटेल, राकेश सोनीमंडलेचा, अमित बुरा, प्रीतम तोडकर, हिरा खूबचंदानी, अरुण जाधव, दिलीप जाधव, अतुल जाधव, सिद्धांत जाधव, अक्षय गाडळकर, विकी कानडे, गौरव शेरकर, मनीष फुलडाळे, संतोष टेके, संजय जंजाळे, धीरज पडोळे, अशोक गाडळकर, कुमार गाडळकर, किरण कानडे, रितेश कानडे, सोमनाथ कानडे, नंदू एकाडे, दिनेश टेकाडे, नितीन एकाडे, विशाल एकाडे, सखाराम जाधव, सचिन दळवी, मनोज लाटे, पोपट निमसे, स्वप्निल घुले, राजू पाचरणे, बाबू पाचरणे, बाबासाहेब गाडळकर, विजय फुगारे, केतन गुंदेचा, संजय पडोळे, गणेश गाडळकर, गोरक्ष पडोळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी

- Advertisement -

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading