मुंबई | ५.६ | रयत समाचार
(Politics) खरात प्रकरणात सत्तेतील तिन्ही घटक पक्षांतील नेत्यांचा थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप करत, आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला टार्गेट करण्यात आल्याचा दावा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
(Politics) रोहित पवार म्हणाले, ज्या व्यक्तीला टार्गेट करण्यात आले, त्यांच्यासोबत या प्रकरणात सहभागी असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ती मात्र या संपूर्ण प्रकरणातून नामानिराळी राहिली आहे.
(Politics) ते पुढे म्हणाले, आता तर खासदारकी आणि मंत्रीपदानंतर विधानपरिषदेची आमदारकीदेखील त्याच घरात गेली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली, तर दुसऱ्याच्या घरात आधीच दोनदोन पदं असताना आता तिसरंही आलं. हाच महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम आहे.
खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी होत असताना, सत्ताधारी नेत्यांकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
