Politics | संभाजी भिडेंची विक्रम पाचपुतेंनी घेतली भेट; राष्ट्रीय विचारांचे मार्गदर्शन लाभल्याचे सुतोवाच

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

सांगली | ५.६ | रयत समाचार

(Politics) श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या सांगली येथील निवासस्थानी आ. विक्रम पाचपुते यांनी भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वारे जाहीर केली.
(Politics) या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची भावना जनमानसात दृढ करण्यासाठी संभाजी भिडे यांनी अनेक दशकांपासून केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला.

Politics

(Politics) युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यसंवर्धन, इतिहासाबद्दल अभिमान आणि समाजाप्रती कर्तव्यभावना जागृत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे आ. विक्रम पाचपुते यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात शिवचरित्र, स्वराज्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या जतन संवर्धनासाठी उभारलेले कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरल्याचेही पाचपुते यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ‘राष्ट्रीय विषयां’वर चर्चा झाली असून संभाजी भिडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading