ग्रंथपरिचय | २० फेब्रुवारी | भैरवनाथ वाकळे
(India news) १४ ऑगस्ट २०२१ रोजी कुमूदसिंह यांचा मेसेज आला. ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास‘ हे लेखिका गंगाबाई यांनी मराठी भाषेत लिहिलेले दरभंगा (बिहार) येथे प्रसिद्ध झालेले पुस्तक शोधायचे आहे. कोणत्याही फॉर्म्याटमधे मला पाहिजे. सध्या त्याच्या मुखपृष्ठाच्या पानाची एक झेरॉक्स प्रत मिळाली आहे. संपुर्ण पुस्तक मिळाले नाही.
(India news) कुमूदसिंह कोण तर दरभंगा राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्ती आहेतच पण याकाळातील धडाडीच्या पत्रकार. बिहारची राजधानी पटणा येथील रहिवासी असलेल्या कुमुद सिंह यांचा जन्म ११ जुलै १९८१ रोजी शंकरपूर इस्टेटमध्ये झाला. बाबू नंदेश्वरसिंह असे त्यांच्या वडिलांचे नाव. त्यांनी पत्रकारीतेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही, परंतु ज्ञानाची तहान आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची प्रवृत्ती लहानपणापासूनच होती. लग्नानंतर त्यांच्या या प्रवृत्तीला पती आशिष झा यांचे संरक्षण मिळाले, तेव्हा राजघराण्यात वाढलेली ही महिला एक सशक्त महिला पत्रकार म्हणून उदयास आली. पत्रकार म्हणून खुलेपणाने लिहिणाऱ्या कुमुद सिंग या सामान्य जीवनात मृदूभाषी आणि मनमिळाऊ स्त्री आहेत. ज्यांच्या सहकाऱ्यांचे बिहारमधील पहिले ऑनलाईन वृत्तपत्र Esamad.com च्या त्या संपादिका म्हणून कार्यरत आहेत. याच मंडळींचे ईसमाद प्रकाशन सुरू आहे. या प्रकाशनाने विविध भाषेतील वाचकांच्या पसंतीस उतरणारी अत्यंत महत्वाच्या विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहे.
(India news) आमचा पुस्तकाचा शोध सुरू झाला. पुस्तकाचे नाव व लेखिकेचे नाव यावरून अनेक ठिकाणी शोधाचे काम सुरू केले. लेखिकेचे फक्त ‘गंगाबाई‘ एवढेच नाव मिळाले होते. त्यांचे आडनाव मिळत नव्हते, त्यामुळेही शोधण्यास अडचण येत होती. तरीही शोध सुरूच होता. ‘मराठी में किताब हैं, आप खोज सकते हैं, मुझे पुरा विश्वास हैं’ या कुमूदसिंह यांच्या वाक्याने जबाबदारी आणखी वाढली होती. विविध ठिकाणी शोध घेत होतो. काही वाचनालयांमधे मिळते का पाहिले. ऑनलाईन शोध घेऊन संदर्भ मिळतो का शोधले. जुन्या इतिहास अभ्यासकांना विचारले, पण संदर्भ अथवा पुस्तक मिळत नव्हते.
२४ एप्रिल २०२२ ला पुन्हा त्यांचा मेसेज आला, ‘एक प्रति का पता चला हैं, मिलने पर अनुवादके लिए आपको देंगी.’
(India news) त्यानंतर थेट १ एप्रिल २०२४ ला पुन्हा मेसेज आला, “ये किताब हमें मिल गयी. अब इसको प्रकाशित करना हैं. मराठी मे मिथिला का इतिहास.” १ मे २०२४ ला त्यांनी पून्हा आदेश दिला, “इसका संपादन आप करेंगे”. “हाँ दिदी, जरूर करेंगे, मुझे आनंद होगा” माझे उत्तर होते. २२ मे २०२४ रोजी त्यांनी “मैं आपको पीडीएफ भेजती हूँ” सांगितले आणि लगेच २३ तारखेला आशिष झा यांनी व्हॉटसअपवर संपुर्ण पुस्तकाचे पीडीएफ पाठविले.
३ नोव्हेंबरला रात्री ९:२५ ला पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि.नाशिक येथे मेहुणे दत्तात्रय वाघ यांच्या घरी पाहुणा गेल्यावर संपादनाचे काम सुरू केले. ४ नोव्हेंबरला संपुर्ण ७६ पानांचे काम पुर्ण होत आले. यापैकी पान नं. १५, ३९, ४९ मिळत नव्हते. ते आशिष यांनी पुन्हा पाठविले. संध्याकाळपर्यंत हेही काम पुर्ण झाले. काही शब्दांचे अर्थ कळत नव्हते, आशिषभाऊंनी सहकार्य केले. तोही प्रश्न सुटला. मख़ना शब्दाचाही प्रश्न सुटला. रात्री ११:३४ ला पुस्तकाचे काम पुर्ण झाले.
आशिष झा आणि कुमूदसिंह यांना धन्यवाद देत मेसेज केला, “यह काम करते हुए मुझे बहुत आनंद मिला. मैं पुरा मिथिला घुम आया. बाद मैं मैने गुगल मॅप पे मिथिला देखी. बहोत मजा आया, आनंद मिला.” पुढील चर्चा करीत असताना लेखिकेचे नाव गंगाबाई रामनाथ बल्हे असल्याची माहिती आशिष झा यांनी दिली. गंगाबाई यांचे कोणी वंशज दरभंगा येथे आहेत का हे शोधले असता आशिष यांनी सांगितले त्यांचा पुतण्या काही दिवसांपूर्वी त्यांचे दरभंगाचे घर विकून वाराणसी येथे स्थायिक झाला आहे.
(India news) इसमाद‘च्या पहिल्या मराठी पुस्तकाचे काम करताना आनंद वाटत होता. लेखिका गंगाबाई यांनी थेट बिहारमधील दरभंगा येथील राजवंशाचा इतिहास मराठी भाषेत लिहिल्याने तिथे मराठी वाचक कोण असावेत ज्यांच्यासाठी गंगाबाई यांनी मराठी भाषेत पुस्तक लिहले, अशी शंका आली. कोण होत्या गंगाबाई ? त्यांचे छायाचित्र ? संपुर्ण नाव आदी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. आशिष झा यांनी माहिती दिली. गंगाबाई या पुण्याहून बोलावलेल्या मराठी शिक्षिका होत्या. दरभंगा राज्याच्या तीन महाराण्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी त्या शिक्षिका म्हणून पुण्याहून दरभंगा राजदरबारात आल्या होत्या. सहकारी सुशांत यांनी अधिक माहिती दिली, ‘लेखिका गंगाबाई द्वारा लिखित मिथिला ब मैथिल राजवंश चा इतिहास १९३८ में प्रकाशित मूल रूप से मराठी में लिखी गई थी और दरभंगा के महाराजा महाराधिराज सर कामेश्वर सिंह की तीसरी पत्नी महारानी काम सुंदरी जी की शिक्षिका थीं।’ एक मराठी शिक्षिका मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास मराठी भाषेत लिहिते हे विशेष होते. इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारी शिक्षका त्यावेळी दरभंगामधे नसल्याने गंगाबाई या पुण्याहून तिथे गेल्या. त्या मुळच्या कोणत्या गावाच्या होत्या ? पुण्यात कोणत्या संस्थेसोबत निगडीत होत्या? त्यांचे छायाचित्र उपलब्ध आहे का ? त्यांनी कोणत्या मराठी वाचकांसाठी मिथिलेचा इतिहास लिहला होता ? गंगाबाईंसंदर्भात असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांचा शोध घेण्याचे काम थांबले नाही, थांबणार नाही. गंगाबाईंचा इतिहास शोधून आपण तो पुढे आणणार आहोत.
१४ ऑगस्ट २०२१ ला सुरू झालेला पुस्तकाचा शोध जानेवारी २०२५ ला पुस्तक पुर्ण होईपर्यंत येवून थांबला. या महिन्यात पुस्तकाची मराठी किंडल, Google Ebook आवृत्ती आणि लवकरच पेपरबॅक आवृत्ती पुनर्प्रकाशित होईल. हे पुस्तक म्हणजे जेथे सिता आणि राम वावरले त्या ‘मराठी व मिथिलेचा ऋणानुबंध’ आहे.
हे महत्वाचे पुस्तक लवकरच हिंदीभाषेमध्ये प्रकाशित होणार आहे. त्यासाठी मरयम सय्यद या कार्यरत आहेत. हिंदी वाचकांसाठीही ईसमाद प्रकाशनाने हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचे आयोजिले आहे. वाचक याचेही स्वागत करतील.
हे पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध व्हावे यासाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या तसेच मला या महत्वाच्या ऐतिहासिक पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी देणाऱ्या कुमूदसिंह, आशिष झा, भवनाथजी झा, सुशांतजी, डॉ. कुमार अमित, सुनिलकुमार भानू आणि ‘ईसमाद‘च्या टीमचे विशेष आभार, धन्यवाद.
हे ही वाचा : ईसमाद प्रकाशनचा ‘मिथिला आणि मैथिल राजवंशाचा इतिहास’ हा ग्रंथ Google Book वरून डाऊनलोड करून वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रयत समाचार Epaper मधील संबंधित बातमी वाचा