central bank of india | स्वप्नील लेकुरवाळे यांची बँक अधिकारीपदी निवड

ग्रामीण भागात शिकत असताना वेगळे काहीतरी करण्याची इच्छा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights
  • Youth Idol

जामखेड | ८ एप्रिल | रिजवान शेख

(central bank of india) तालुक्यातील जवळा येथील रहिवाशी स्वप्नील लेकुरवाळे यांची आय.बी.पी.एस. या बँकिंग परीक्षे अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया असिस्टंट अधिकारी या पदासाठी निवड झाली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वस्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.

(central bank of india) स्वप्नीलचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले. पुढे बारावीचे शिक्षण कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालय येथे तर पुढील शिक्षण बारामतीत झाले. तेथूनच काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच बँकिंग क्षेत्र निवडले. पुणे येथे आय.बी.पी.एस. परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले परंतु निराश न होता अभ्यास सुरू ठेवल्यानंतर पुन्हा परीक्षेस सामोरे जात दुसऱ्या प्रयत्नात स्वप्नीलने चांगले गुण मिळवत यश संपादन केले.Central bank of india

(central bank of india) अधिक माहिती देताना स्वप्निल यांनी सांगितले, वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. त्यांच्याच माध्यमातून अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. ग्रामीण भागात शिकत असताना वेगळे काहीतरी करण्याची इच्छा होतीच परंतु ते शोधणे गरजेचे आहे. आय.बी.पी.एस. किंवा असे अनेक स्पर्धात्मक परिक्षा आहेत ज्यातून वेगळे करिअर करण्याची संधी असते. मला मिळालेल्या या यशाबद्दल समाधानी आहे. उत्तम संस्कार आणि मार्गदर्शनाबद्दल आईवडीलांचा मी ऋणी आहे.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading