Politics | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फारुक अली पटेल यांची आ. जगताप यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याची मागणी

बीड | १०.१० | रयत समाचार

(Politics) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे बीड शहरातील ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष फारुक अली पटेल यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषद आणि शहर पोलीस ठाणे बीड यांच्याकडे मागणी केली आहे की, आमदार संग्राम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चास परवानगी देऊ नये.

(Politics) अजित पवार राष्ट्रवादीच्या पटेल यांनी म्हटले की, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपणे हे बीड शहराची ओळख आहे, मात्र अलीकडच्या काळात काही नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांमुळे शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः १४ ऑक्टोबर रोजी बीड शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्चात पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे.

(Politics) अजित पवार राष्ट्रवादीचे पटेल म्हणाले, शहरातील शांतता, बंधुभाव आणि एकोपा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. अशा प्रकारच्या मोर्चामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल, म्हणूनच प्रशासनाने या मोर्चास परवानगी नाकारावी.

निवेदनावर फारुक पटेल यांच्यासह अशफाक इनामदार, शकील खान, मोईन मास्टर, बरकत लाला पठाण आणि अतिफ पटेल यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड, आणि मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनाही पाठविण्यात आली आहे.

फारुक पटेल यांनी प्रशासनाला विनंती केली आहे, बीड शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भडक मोर्चांना त्वरित परवानगी नाकारावी.

 

Share This Article