नगर तालुका | २ एप्रिल | संदिप पवार
(Education) तालुक्यातील पिंपळगाव माळवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु.स्वरा वैभव सदावर्ते ही नॅशनल स्कॉलरशिप राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत २०० गुणांपैकी १९४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक संपादन केला. शिवांश तुकाराम साबळे देखील याच स्पर्धा परीक्षेत २०० गुणांपैकी १७४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत महाराष्ट्र राज्यात अकरावा क्रमांक संपादन केला.
(Education) या स्पर्धेतील नेत्रदिपक कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा श्रीसंत सावतामाळी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. देवराम मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना पिंपळगाव माळवी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक लोंढे सर, मार्गदर्शक शिक्षक ज्ञानदेव पानसरे व मुळीक मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.