(Latest news) तोफखाना पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस हवालदार प्रमिला सुर्यभान गायकवाड यांनी फेब्रुवारी २०२५ चा ‘टॉप कॉप ऑफ द मन्थ’ पुरस्कार पटकाविला. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याप्रमाणे प्रमिला गायकवाड या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी म्हणून पोलिस दलासह जनतेत प्रसिध्द आहेत. त्यांनी केलेल्या कौशल्यपुर्ण कामगिरीची दखल वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घेतली.
(Latest news) त्यांच्यासोबतच भिंगार पोलिस स्टेशनचे इजराईल पठाण, शहर वाहतुक शाखेचे रामराव शिरसाठ तसेच कोतवाली पोलिस स्टेशनचे शिरीष तरटे यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार गुन्ह्यांची सक्षम निर्गती, कायद्याप्रती कर्तव्यदक्षता, पोलिस प्रशासनाचे जनमानसात नाव उंचावण्याची कामगिरी केल्याबद्दल दिला जातो.
(Latest news) सर्व पुरस्कारार्थींचा उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते प्रशंसापत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी अमोल भारती म्हणाले, पोलीस दलास आपल्या या कामगिरीबाबत अभिमान आहे. भविष्यातही आपण असेच परिश्रम घेऊन पोलीस दलाचे नाव उंचवण्यास मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. याप्रसंगी पोलिस इन्स्पेक्टर आनंद कोकरे, पोलिस इन्स्पेक्टर दराडे आदी उपस्थित होते.