मुंबई | ५.४ | रयत समाचार
(Art) मराठी रंगभूमीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी ‘नाट्यलेखन स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘कामाक्षी क्रिएटिव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, मराठी नाट्यविश्वात नवे विचार आणि दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचा यामागील उद्देश आहे.
(Art) या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विषयावर कोणतेही बंधन नसून स्पर्धकांना दोन अंकी मराठी नाटक लिहिण्याची संधी दिली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून प्रत्येक स्पर्धक एकापेक्षा अधिक नाट्यसंहिता सादर करू शकतो.
(Art) स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२६ या कालावधीत लिहिलेल्या नाट्यसंहितांचा स्वीकार केला जाणार आहे. मात्र, ही स्पर्धा सशुल्क असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाट्यसंहिता [email protected] या ईमेलवर पाठवावी. अधिक माहितीसाठी गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ किंवा राकेश तळगावकर ८५९१८२५७७५ यांच्याशी संपर्क साधावा.
मराठी नाट्यलेखन क्षेत्रात नाव कमावण्याची इच्छा असलेल्या लेखकांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
