मुंबई | ८.७ | रयत समाचार
(Farmer Loan Waiver) शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसंदर्भात आयोजित बैठकीला वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “हे सरकार लबाड, ढोंगी, दांभिक आणि विश्वासघातकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले,” असा आरोप आमदार पवार यांनी केला.
(Farmer Loan Waiver) रोहित पवार यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत बुधवारी सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ठरलेल्या वेळेनुसार शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहिले. मात्र, एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित झाला नाही. ऐनवेळी फोनवरून बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
(Farmer Loan Waiver) या प्रकारावर संताप व्यक्त करताना पवार म्हणाले, सरकारच्या आदेशाशिवाय कोणताही अधिकारी अशी हिंमत करू शकत नाही. हा केवळ आमच्या शिष्टमंडळाचा अवमान नसून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अपमान आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांची थट्टा केली आहे.
ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांशी मूक संवाद साधण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली आहे. येणारे वर्ष शेतकऱ्यांसाठी अधिक कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या फसव्या धोरणाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. आम्ही लढत आहोतच, पण आता शेतकऱ्यांनीही या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
दरम्यान, शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, बैठकीनिमित्त ‘मित्रा’ कार्यालयात गेल्यानंतर परदेशी समितीचा अहवाल हाती लागला. “शेतकरी कर्जमुक्तीसाठी अहवालात सुचविलेल्या उपाययोजना पाहिल्यानंतर कपाळावर हात मारून घ्यावा अशी परिस्थिती आहे. समितीचे प्रमुख चर्चेला का आले नाहीत, यामागे या शिफारशीही एक कारण असू शकते,” असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा : Ram Mandir Donation | मंदिरच सुरक्षित नाहीत तर आस्था कुठे सुरक्षित?; राममंदिर देणगी चोरीवर शंकराचार्यांचा संतप्त सवाल
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे असून, शेतकरी संघटनांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



