अहमदनगर | ३० जून | रयत समाचार
(Farmer Loan Waiver) राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ३० जून संपत आला तरी कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केला.
(Farmer Loan Waiver) सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनी म्हटले, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कर्जमाफीची मोठी अपेक्षा होती. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न करता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

(Farmer Loan Waiver) सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


