अहिल्यानगर | १२.०९ | रयत समाचार
English Medium Satsang: निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने युवावर्गासाठी झोनस्तरीय इंग्लिश मीडियम समागम (EMS) निमित्त विशाल सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नगर-मनमाड रोडवरील संजोग लॉन्स येथे हा कार्यक्रम उत्साहात होणार आहे.
या इंग्लिश मीडियम सत्संग सोहळ्यास अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह अहिल्यानगर झोनअंतर्गत येणाऱ्या शाखांपैकी बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील युवा संत व साधसंगतचे भाविक सहभागी होणार आहेत, अशी माहिती झोन ३६-एचे झोनल इन्चार्ज श्री. हरीश खुबचंदानी यांनी दिली.

श्री. हरीश खुबचंदानी यांनी सांगितले की, जगातील ६० हून अधिक देशांमध्ये पोहोचलेली संत निरंकारी मिशनची विचारधारा इंग्रजी या जागतिक भाषेच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात युवकांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. इंग्रजी भाषेत गीत, विचार, मनोगते, कविता, नाटिका आदींच्या माध्यमातून सद्गुरूंची पावन शिकवण तसेच मिशनच्या दैवी मूल्यांचा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला जाणार आहे.
या आध्यात्मिक इंग्लिश मीडियम सत्संग कार्यक्रमास युवावर्गाने तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


