मुंबई | १०.६ | गुरूदत्त वाकदेकर
(Art) मुंबईतील नाट्यप्रेमींसाठी गोव्यातील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय पाहण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार आणि प्रविण थिएटर मुंबई यांच्या सौजन्याने दादर येथील प्रसिद्ध श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात दोन भव्य नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. गजांतलक्ष्मी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब वळवई, फोंडा-गोवा निर्मित आणि स्नेहनारायण कलामंच, वळवई यांच्या वतीने हे प्रयोग सादर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नाटकांना प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
(Art) ऐतिहासिक नाटक : ‘आकाशमिठी’ : शौर्य, स्वराज आणि शौर्याचा दैदिप्यमान इतिहास उलगडणारे दोन अंकी गुरूवारी ता. ११ जून रोजी संध्या. ४ वाजता ऐतिहासिक नाटक ‘आकाशमिठी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाला राज्य पातळीवर उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट नेपथ्य अशी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
(Art) लेखक वसंत कानेटकर संहितांतर व दिग्दर्शन हेमचंद्र नारायण तारी यांचे आहे. शुक्रवारी ता. १२ रोजी सकाळी ११ वाजता वि.वा. शिरवाडकर लिखित आणि भालचंद्र उसगांवकर दिग्दर्शीत एक पौराणिक कथेवर आधारित आणि अजरामर संगीत पदांनी नटलेले ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.
श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई या दोन्ही नाटकांचे प्रयोग पूर्णपणे विनामूल्य आहेत. नाटकाची प्रवेशिका मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर संपर्क साधावा. प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.
मुंबईतील सर्व नाट्यप्रेमींनी आणि गोमंतकीय बांधवांनी या दोन्ही प्रयोगांना उपस्थित राहून गोव्यातील कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



