Ad imageAd image

Education | आज शाळा पाडली, उद्या जनता अहंकार पाडेल- गाडे पाटील; शाळेवर बुलडोझर; भाजपवर हुकूमशाहीचा आरोप

न्यायालयीन वाद सुरू असतानाच कारवाई

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नांदेड | १०.६ | रयत समाचार

(Education) माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसमधून भूमिका घेतल्याची राजकीय किंमत म्हणून काँग्रेस नेते गोविंद पाटील गौड यांच्या मान्यताप्राप्त अनुदानित शाळेवर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या कारवाईविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेस, नांदेडचे अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

(Education) बालाजी गाडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, संबंधित जागेचा वाद न्यायप्रविष्ट असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

(Education) त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा कृषी उत्पन्न बाजार समितीने (मार्केट कमिटी) २०६३ पर्यंत लीजवर दिलेली आहे. असे असताना शाळेची इमारत पाडण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार, राज्यात विरोधकांवर दबाव टाकण्याचे राजकारण सुरू असून ही कारवाई त्याचाच एक भाग आहे. या देशात आता हुकूमशाहीचे वातावरण निर्माण होत आहे. आज तुम्ही लेकरांची शाळा पाडली, उद्या जनता तुमचा अहंकार पाडेल, असा इशाराही गाडे पाटील यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणी प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच जागेच्या मालकी, लीज आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिकृत कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading