Politics: पुन्हा 'जोहार मायबाप जोहार' म्हणणारा लाचार माणूस जन्माला घालणार का ? - ॲड. प्रतापराव ढाकणे - Rayat Samachar

Politics: पुन्हा ‘जोहार मायबाप जोहार’ म्हणणारा लाचार माणूस जन्माला घालणार का ? – ॲड. प्रतापराव ढाकणे

रयत समाचार वृत्तसेवा

लोकशाहीचा चौथा स्तंभ लाचार झाला तर समाजव्यवस्था धोक्यात येईल

पाथर्डी | ४ डिसेंबर | राजेंद्र देवढे, विशेष प्रतिनिधी

Politics समान नागरी कायद्याची भाषा गोंडस आहे. ती ऐकून तुमच्या पोटात गुदगुल्या होत असतील तर ते दुदैवी आहे. यात फक्त मुस्लिम व दलित अनुस्यूत नाहीत तर अनेकांचे घटनात्मक अधिकार काढून घेतले जातील. त्यामुळे पुन्हा एकदा ‘जोहार मायबाप जोहार,’ म्हणणारा लाचार माणूस जन्माला घालणार का ? असा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी उपस्थितांना विचारला.

Politics रविवारी ता.०१ डिसेंबर रोजी भाजी बाजार मैदानावर, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिक व मतदारांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ढाकणे बोलत होते. आमदार रोहित पवार, राणीताई लंके, शिवशंकर राजळे, हरीश भारदे, बंडू पाटील बोरुडे, वसंत खेडकर, सीताराम बापू बोरुडे, सुभाष केकाण, नासिरभाई शेख, राजेंद्र दौंड, दिगंबर गाडे, हुमायून आतार, योगेश रासने, रामराव चव्हाण, जालिंदर काटे, हेमंत सुपेकर, योगिता राजळे, सविता भापकर, ज्योती जेधे, आरती निऱ्हाळी, रत्नमाला उदमले, उषा जायभाये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ लाचार झाला तर समाजव्यवस्था धोक्यात येईल, असे सांगत ढाकणे यांनी उपस्थित पत्रकारांना तटस्थ भावनेने पत्रकारिता करण्याचे आवाहन केले.

मान्य नसल्यामुळे आरक्षण बाद होईल. मी लढणारा माणूस असून माझा नवा जन्म झाला आहे. माझी कर्जमागणी हाणून पाडली असली तरी मी कारखाना सुरू करीलच ! विजयी उमेदवाराच्या विरोधात ०१ लाख ६५००० मतदान झाले असल्याने मी या मतदारांचा आमदार आहे. कुणालाही त्रास झाला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मला घटनेने दिलेल्या अधिकारांच्या आड कुणी आला तर त्याला सोडणार नाही. मी व खासदार निलेश लंके गरीबांसाठी गुंड आहोत. चोरी करून मिळालेल्या सत्तेचा उपयोग गोरगरिबांसाठी झाला तरच त्याला काही अर्थ आहे. तुम्ही माझे सर्वस्व आहात म्हणून मी तुमच्या ऋणात राहू इच्छित असल्याने ऋणमुक्त होणार नाही, असे ढाकणे शेवटी म्हणाले.
     काठावरचा पराभव मान्य न करता, मी नव्या उमेदीने लढणार आहे. निवडणुकीपूर्वी कुणालाही माहित नसलेला उमेदवार मतदानयंत्राने निवडून आणला आहे. हा आपला पराभव नसून विजयच आहे. आम्हाला हुकुमशाही कदापीही मान्य नाही. तुम्ही अशीच साथ दिली तर प्रतापकाकांचा उत्साह वाढेल, असे राणीताई लंके म्हणाल्या.
 शिवशंकर राजळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. गणेश सरोदे यांनी केले तर योगेश रासने यांनी आभार प्रदर्शन केले.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment