Social: महिलांसह दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने एस.पी.ऑफिससमोर आमरण उपोषण - Rayat Samachar
Ad image

Social: महिलांसह दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने एस.पी.ऑफिससमोर आमरण उपोषण

४ डिसेंबर रोजी उपोषण सुरू

श्रीगोंदा | २ डिसेंबर | माधव बनसुडे

Social वसंत सकट यांनी २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असूनही त्यामधील आरोपी खुलेआम गज, काठ्या व तलवारी घेऊन फिरत आहेत व जिवे मारण्याचे धमकी देत आहेत, याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी फिर्यादी महिलांची कुचंबना करून अपमानास्पद वागणूक दिली, अशी महिती वसंत सकट यांनी दिली.

Social सकट यांनी सांगितले, पो.नि. किरण शिंदे हे दलितविरोधी असून जामनेर येथेही भिल्ल समाजावर झालेले अन्यायाबाबत एकमेकांवर भडकावून दंगल पेटवण्याचे काम केल्याने तेथे दलित भटके यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्या प्रकरणात बदली होऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली तर पो.नि. शिंदे यांनी दलित कार्यकर्त्यांवर अपमानास्पद वागणूक देऊन जातीय तेढ निर्माण करत असल्याने तसेच परस्पर खोट्या केसेस करण्यास भाग पाडून आपापसात भांडणे लावून देण्याचे काम करत आहेत.

त्यामुळे संबंधितावर त्वरित कारवाई व्हावी. यासाठी ४ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आरोपी अटक होईपर्यंत व पो.नि. किरण शिंदे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार, म्हटले आहे.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment