Health: एन.एस.एस.प्रमुख व विद्यार्थीवर्गाशी संपर्क साधल्यास रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होईल - रफीक मुन्शी; औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक व विद्यार्थी मिळून २०० जणांनी केले रक्तदान - Rayat Samachar

Health: एन.एस.एस.प्रमुख व विद्यार्थीवर्गाशी संपर्क साधल्यास रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होईल – रफीक मुन्शी; औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक व विद्यार्थी मिळून २०० जणांनी केले रक्तदान

रयत समाचार वृत्तसेवा

रक्तदान करूनच रक्ताची गरज भागवता येते – प्राचार्य खालीद जहागीरदार

अहमदनगर | २ डिसेंबर | समीर मन्यार

Health ईश्वराने आपल्याला मानव जन्म दिला आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून सर्वांनी सामाजिक उपक्रमांचा भाग बनले पाहिजे. रक्तदान शिबिर हा एक सामाजिक उपक्रम आहे. दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भेडसावतो. अपघाताचे वाढते प्रमाण त्यामुळे झालेला अतिरिक्त रक्तस्राव, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, रक्ताची आवश्यकता असल्यास रक्तदान करूनच रक्ताची गरज भागवता येते. प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यास रक्ताचा भासणारा तुटवडा हा मोठ्या प्रमाणावर दूर होईल त्यामुळे अनेकांना जीवदान मिळेल. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन कै.माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगरचे प्राचार्य खालीद जहागीरदार यांनी केले.

       Health कै.माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटी, एचडीएफसी बँक, एनएसएस आयटीआय, यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहीद दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य खालीद जहागीरदार बोलत होते.

याप्रसंगी एचडीएफसी बँकेच्या क्लस्टर हेड उज्वल कुंभोजकर शाखाधिकारी श्रीनिवास पिंगळे, प्रसाद रसाळ, भीमसेन भंडारी, रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीचे सचिव निखिल कुलकर्णी, निवृत्त समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, रवी डिक्रुझ, जिल्हा संक्रमण अधिकारी सुमय्या खान, गर्जे, संतोष काळे, हेमंत लोहगावकर आदींसह विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी निवृत्त समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा रोटरी इंटिग्रीटी क्लबचे रफिक मुन्शी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था रक्तदान शिबीर आयोजित करते. रक्तदानाची ही चळवळ कौतुकास्पद असून नगरला भूषणावह आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अपघात प्रसंगात रक्त पुरवठा आवश्यक असतो, तसेच थँलेसेमीया मेजर करीता रुग्णास विहित वेळेस रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करीत असतांना महाविद्यालय येथील एन.एस.एस. प्रमुख व विद्यार्थीवर्गाशी संपर्क साधल्यास रक्तदात्याची संख्या वाढ होईल, अशी सूचना यावेळी त्यांनी मांडली.
एचडीएफसी बँकेचे अधिकारी उज्वल कुंभोजकर व श्रीनिवास यांनी बँक सामाजिक भान ठेवून अशा शिबीरास पूर्ण सहकार्य करीत असल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी श्रीमती खान यांनी रक्तगट कसे असतात, रक्ताचे दान केल्यानंतर रक्त कसे शरीरात पुन्हा तयार होते, याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.ई. खाकाळ यांनी केले तर आभार व्ही.एल. बेंद्रे यांनी मानले.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment