Forest: गरीबांच्या घरकुलास बंदी; मोठ्या लोकांच्या शेती अतिक्रमणाकडे दूर्लक्ष तर गरीबांच्या घरावर बुलडोझर; वनविभागाचा हेकट कारभार ? - Rayat Samachar
Ad image

Forest: गरीबांच्या घरकुलास बंदी; मोठ्या लोकांच्या शेती अतिक्रमणाकडे दूर्लक्ष तर गरीबांच्या घरावर बुलडोझर; वनविभागाचा हेकट कारभार ?

म्हैसगांव वनविभाग गट नंबर १७६ मध्ये ५४ हेक्टर जमीनीवर शेती केली जाते, परंतु याकडे वन विभागाचे दूर्लक्ष

राहुरी | २ डिसेंबर | दत्ता जोगदंड

तालुक्यातील म्हैसगांव येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत ५५ घरकुल मंजूर झाले. बांधकामही सुरू करण्यात आले परंतु काही घरकुल Forest विभागामध्ये असल्यामुळे घरकुल बंद करण्यात यावे, असे वन विभागचे वरिष्ठ वनाधिकारी यांनी फोनवरून म्हैसगाव ग्रामसेविका एस.यु. पठाण यांना सांगितले. त्यामुळे ग्रामसेविका यांनी घरकुल बंद करण्याच्या गरीबांना सुचना दिल्या.

म्हैसगांवमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी, मागासवर्गीय व इतर हे Forest विभागामध्ये खुप दिवसांपासुन राहत आहेत. काही आदिवासींना ही वनजमीन वर्ग करण्यात आली. याठिकाणी त्यांची जुनी घरेही आहेत. त्यांना नवीन घरकुल आले ते मंजुर होऊन पैसे बॅंकेमध्ये वर्ग झाले. वन विभागाने घरकुल चालू बंद करा व नवीन घरकुल बांधु देऊ नका, असे ग्रामसेविका यांना संगितल्यामुळे त्यांनी ही घरकुल बंद करण्यास सगितले. या अगोदर शासकीय वन विभागामध्ये घरकुले झाली आहे परंतु यापुढे या ठिकाणी घरकुल बांधणे बंद केले.

दरडगांव थडी, चिखलठाण व म्हैसगांवमधील वनविभाग गट नंबर १७६ मध्ये ५४ हेक्टर जमीनीवर शेती केली जात आहे, परंतु याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे, मात्र गरीबांची शासनाने दिलेली घरकुलांची कामे बंद करण्याचे पाप वनविभाग करत असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
वरिष्ठ अधिकारी यांनी फोनवरून म्हैसगावमधील वनजमिनीवरील घरकुल बंद करायला सांगितले. त्यावरून घरकूल बंद करण्यास सुरुवात केली. घरकुलांची कामे बंद केली.
– एस.यु. पठाण, ग्रामसेविका
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment