डॉ.कमलाकर तांबटकर व सहकारी टीम यांनी केली आरोग्य तपासणी
अहमदनगर | १ डिसेंबर | लक्ष्मण मडके
Education शाहु शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित सी.डी. देशमुख लॉ कॉलेज अहमदनगर येथे संस्थेच्या आधारवड स्व.अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आहार विहार मार्गदर्शक डॉ.कमलाकर तांबटकर व त्यांचे सहकारी टीम यांनी तपासणी केली. रक्तदान शिबिर जनकल्याण ब्लड बँकेच्या वतीने घेण्यात आले, तसेच संविधान दिनाच्या औचित्य साधून प्रास्ताविकेवर सविस्तर समुदायिक विचार मंथन करण्यात आले. यावेळी Education मार्गदर्शक डॉ.अतुल मोरे यांनी केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य सारंग गणबोटे, प्रा.सचिन तरटे, प्रा.क्रांती बागुल, प्रा.सिद्धी, प्रा.आण्णासाहेब थोरात, प्रा.सविता तांबे, प्रवीण शेलार, ऋषिकेश थोरात, गौरव धलपे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सेक्रेटरी प्रा.साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?