‘आरोग्य शिबिरां’चे आयोजन; राज्यात १० हजार पत्रकारांची होणार तपासणी
अहमदनगर | २ डिसेंबर | दिपक शिरसाठ
Ahilyanagar News ३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे ‘पत्रकार आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील २६५ तालुक्यात ही शिबिरे झाली. त्यात १० हजारपेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हा जागतिक विक्रम होता.
Ahilyanagar News अहमदनगर येथे यंदा मराठी पत्रकार परिषदेने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने ३ डिसेंबर २०२४ रोजी अर्बन हेल्थ सेंटर, सावेडी येथे सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिरामधे ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, हिमोग्लोबिन यासह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार येतील तसेच शिबिराला येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला हिवाळ्यात उपयोगी पडेल असे एक खास ‘आरोग्य किट’ दिले जाणार आहे. सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे मराठी पत्रकार परिषद अहमदनगर शाखेने आवाहन केले.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ रोजी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. राज्यात ३५४ तालुके आहेत. या सर्व तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन ही शिबिरे यशस्वी करावीत असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.
पत्रकारांचे आयुष्य दगदगीचं असते. जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठीच ही शिबिरे होत आहेत. स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरे यशस्वी करावीत असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
खूप छान आहे सर हे आम्ही नक्की उपस्थित राहू
शिबीरास पत्रकारीता विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे.