नगर तालुका | १४ ऑक्टोबर | समीर मनियार
ahmednagar news तालुक्यातील वाळुंज येथील नालंदा स्कुलमध्ये सर्व शिक्षकवृंदांना तिच्या उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या विषयावर प्राइम व्हिजनच्या डॉ. श्वेता भालसिंग यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या संचालिका पल्लवी बहादूर्गे, यशवंत बहादुर्ग व शिक्षकवृंद उपस्थितीत होते.
डॉ.भालसिंग यांनी मुलांमधील दृष्टी विकारांची लक्षणे ओळखणे, डोळ्यांची दृष्टी किती चांगली/वाईट आहे हे ओळखणे. अचूक ओळख आणि कृतीचे फायदे, आई-वडिलांना नेत्रचिकित्सकांना भेट देण्यास प्रवृत्त करणे आणि मुलाला भावनिक आधार कसा द्यावा, याची सविस्तर माहिती देत अलीकडच्या काळामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या विकाराबरोबर मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यासाठी मोबाईल पासून मुलांना दूर कसे ठेवावे व पुस्तकी ज्ञान त्यांना कसे देता येईल, यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
संचालिका पल्लवी बहादूर्गे म्हणाल्या, विद्यालयाच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षकांना तिच्या उपक्रमांतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ.भालसिंग यांनी शिक्षकांनी मुलांची डोळ्यांची घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नालंदातील सर्व शिक्षकवृंद यांनी डॉ. भालसिंग यांचे आभार मानले. त्यांना शारिरीक तपासणी बरोबरच नेत्रदृष्टी चाचणीचा नियमित सराव करून घेण्याचे आश्वासन दिले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा