Breaking News

Politics: शरदचंद्र पवार साहेब यांनी पेरलेल्या पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पाडाल हा विश्वास – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

70 / 100

राहुरी | १४ ऑक्टोबर | मनोज हासे

Politics भारतीय जनता पक्षाचे राहुरी येथील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ आणि राहुरी खुर्द येथील युवा कार्यकर्ते युनूस शेख तसेच त्यांचे सहकारी ललित दुधाडे, सिद्धार्थ गायके व सागर काळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे हा छोटेखानी समारंभ संपन्न झाला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, सर्व युवा सहकाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी पेरलेल्या पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी आपण यशस्वीरीत्या पार पाडाल हा मला विश्वास आहे.

यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, मयूर शेळके उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *