अहमदनगर | १३ ऑक्टोबर | तुषार सोनवणे
Politics येथील बोल्हेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने विजयादशमीनिमित्त शेतकरी सभासदांना मिठाई वाटप केली. गेल्या तीस बत्तीस वर्षापूर्वी स्थापन झालेली ही सोसायटी आजपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आली.
याविषयी अधिक माहिती देताना चेअरमन किसन उमाजी कोलते म्हणाले, जिल्हा बँकेडून शासनाच्या नवनवीन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यात येते. शेतकऱ्यांना कर्ज वाटप, शेती अवजारे यासाठी माफक दरात कर्ज स्वरूपात मदत तसेच एक रुपयात पिकविमा,पशुधनासाठी कर्ज यासारख्या अनेक योजना सोसायटी राबविते. पारदर्शक कारभारामुळे संचालक सभासदांमधे लोकप्रिय असल्याचे जाणवते.
ते पुढे म्हणाले, शेतकरी हिताचे काम सोसायटी नेहमीच करते म्हणूण निवडणूक आजपर्यंत बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे. यंदाच्या टर्ममधे शेतकऱ्यांना जवळजवळ अडीचकोटी रूपये पर्यन्त कर्ज मिळवून देण्यात सोसायटी यशस्वी झाली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सोसायटी संचालक व सभासदांचे चांगल्या कामामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्यामुळे गावाचा विकास होत आहे.
यावेळी व्हा.चेअरमन सुरेश बन्सी वाटमोडे, सचिव रेवजी निमसे, माजी चेअरमन बबन कळमकर, संपत वाकळे पाटील, सुनील देठे, रेहमान सय्यद, बाळासाहेब गंगाधर वाकळे, सुभाष वाकळे, वैभव वाटमोडे, नवनाथ कराळे, राजू देठे, हरीदास आरडे आदि उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा