Ahmednagar News: ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; अभिषेक कळमकर यांचा नागरी प्रश्नांसाठी पुढाकार - Rayat Samachar
Ad image

ahmednagar news: ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; अभिषेक कळमकर यांचा नागरी प्रश्नांसाठी पुढाकार

74 / 100

अहमदनगर | ५ ऑक्टोबर | प्रतिनिधी

ahmednagar news राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सुरू केलेल्या ‘नगर जनसंवाद यात्रे’ला उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. संपूर्ण मतदारसंघात पायी भ्रमण करून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याच्या या उपक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. कळमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध भागांना भेटी देत, स्थानिकांशी थेट संवाद साधला. यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, स्त्रीसुरक्षा, पायाभूत सुविधा, एमआयडीसी विकासासह शहर विकास यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होत असून, अनेक जण आपापले प्रश्न मांडत आहेत.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

अभिषेक कळमकर यांनी यात्रेच्या उद्देशाबद्दल बोलताना सांगितले, नगरच्या विकासासाठी लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नगरवासीयांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळत आहे, आणि आम्ही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यात्रेच्या पहिल्या टप्प्यात कळमकर यांनी प्रभागांना भेटी देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी कळमकर यांचे स्वागत करत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

‘नगर जनसंवाद यात्रा’ यशस्वीपणे सुरू असून, या यात्रेमुळे नगरच्या विकासासाठी एकत्र येण्याची भावना निर्माण होत आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment