Ahmednagar News: आ. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो विरोधात शेतकरी कुंडलिक जायभाय यांचे १ ऑक्टोबर रोजी उपोषण; जमिनखरेदी फसवणुकीचा आरोप - Rayat Samachar
Ad image

ahmednagar news: आ. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो विरोधात शेतकरी कुंडलिक जायभाय यांचे १ ऑक्टोबर रोजी उपोषण; जमिनखरेदी फसवणुकीचा आरोप

64 / 100

कर्जत | ३० सप्टेंबर | प्रतिनिधी

ahmednagar news कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील शेतकरी कुंडलिक जायभाय यांची मौजे भांडेवाडी गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली, जमीन परस्पर विक्री देखील केली. आपल्याला आजमितीस जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या प्रकाराबाबत तालुका प्रशासनाकडे दाद मागितली असता त्यांनी देखील दुय्यम वागणूक दिली, असा आरोप जायभाय यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांचे चिरंजीव ॲड. कृष्णा जायभाय उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनाही प्रशासन जुमानत नसल्याचे उदाहरण समोर येत आहे. १२.७.२०२४ रोजी विधानपरिषद सभागृहात मांडूनही प्रशासनाची काहीच कारवाई नसल्याची जायभाय यांची माहिती.

या अन्यायाच्या विरोधात कुंडलिक जायभाय यांनी ता. १ ऑक्टोबर रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कर्जत-जामखेडचे आ. रोहित राजेंद्र पवार संचालक असलेल्या बारामती ॲग्रो प्रा.लि. कंपनीचे प्रतिनिधी सुभाष गुळवे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये कुंडलिक जायभाय यांची समक्ष भेट घेत आ. रोहित पवार यांना कर्जतमध्ये राहण्यासाठी घर बांधायचे आहे. यासाठी तुमच्या मालकीची भांडेवाडीचे गट क्रमांक ५१०/२ एकूण ५ एकर पैकी २ एकर क्षेत्र घर बांधणीसाठी पसंत पडलेले आहे. त्यानुसार चर्चेअंती जायभाय यांच्या मालकीची २ एकर क्षेत्र रोहित पवार यांचे घर बांधण्यासाठी देण्याचे ठरले होते. तसेच उर्वरित ३ एकर जागा संपूर्ण विकसित करून ती बिनशेती करून त्यास कंपाऊंड करून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटचे व इलेक्ट्रिकची सोय आम्ही करून देऊ असे सांगण्यात आले. यासह लगतच्या रस्त्यांची सुधारणा होईल असा विश्वास दिला. कोरोना महामारीमुळे व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे जायभाय यांना देखील व्यवसायासाठी तसेच प्रापंचिक गरजेसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी या व्यवहारास अनुकुलता दाखवली. त्यांच्यावर विश्वास ठेवत प्रामाणिक हेतूने व तत्कालीन बाजारभावापेक्षा कमी किमतीने जागेचा व्यवहार ठरला. आणि ही जागा २० ऑक्टोबर २०२१ रोजी आ. रोहित पवार संचालक असलेल्या बारामती ॲग्रो प्रा. लि. कंपनीच्या नावाने करून घेऊ, असे सुभाष गुळवे यांनी जागेचे मालक कुंडलिक जायभाय यांना सांगितले.

मात्र त्या दिवशी या जागेचे खरेदीखत न करता त्यांनी साठेखताचा दस्त करून घेतला. तसेच २ एकर जागेचा मोबदला म्हणून ५२ लाख रुपयांचा धनादेश ता.१८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिला. हा व्यवहार झाल्याच्या दोन दिवसांनी ता. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी ५२ लाख रुपयांचा धनादेश जायभाय यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, अहमदनगर या खात्यात भरला असता चेक न वटता परत आला, बाऊंस झाला. त्यानंतर वारंवार विनंती करून देखील जागामालक जायभाय यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्यात आले नाही. याउलट हा व्यवहार पूर्ण न करता राजकीय बळाचा वापर करून व शासकीय अधिकाऱ्यांवर दबावतंत्र वापरून त्यांच्या परस्पर कोणतीही पूर्वकल्पना न देता ते क्षेत्र ता.१३ एप्रिल २०२३ रोजी तिऱ्हाईत इसमांना विक्री केल्याचा आरोप कुंडलिक जायभाय यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

झालेल्या घटनेनंतर श्रीगोंदा न्यायालयात धाव घेतली कोर्टात दाखल केलेल्या दाव्यामध्ये देखील मे. कोर्टाने आपली फसवणूक झाल्याचे सविस्तर निरीक्षण करून मनाई हुकमाचा आदेश परित केलेला आहे. तरी देखील कोर्टाच्या आदेशानंतरही या व्यक्ती जागा बळकवण्याच्या हेतूने या जागेवर कंपाऊंड करण्याचा प्रयत्न करीत न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे म्हटले.

तालुका प्रशासनाची चुप्पी आणि दुय्यम वागणूक

मौजे भांडेवाडी ५१०/२ जागेबाबत प्रांताधिकारी कर्जत उपविभाग, तहसीलदार यासह पोलीस प्रशासनास निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांनी या गंभार बाबीकडे सपशेल डोळेझाक करीत उलट आपण केलेली तक्रार मागे घ्या, असे फर्मान सोडले. तसेच प्रशासनास हाताशी घेत राजकीय बळाचा वापर करीत वरील क्षेत्रावर खोटी पीक नोंदी लावून त्यास कंपाऊंड टाकून बळकाविण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्व प्रकारास कंटाळून कुंडलिक जायभाय यांनी ता.१ ऑक्टोबर २०२४ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment