Ahmednagar News: व्यवस्थेला भिती असते विचार करणाऱ्या आणि वेगळा विचार मांडणाऱ्या माणसांची - संपादक संजय आवटे; 'अर्शदनामा'चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे आणि आवटे यांच्या हस्ते प्रकाशन - Rayat Samachar
Ad image

ahmednagar news: व्यवस्थेला भिती असते विचार करणाऱ्या आणि वेगळा विचार मांडणाऱ्या माणसांची – संपादक संजय आवटे; ‘अर्शदनामा’चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे आणि आवटे यांच्या हस्ते प्रकाशन

छायाचित्र - पंकज गुंदेचा
67 / 100

अहमदनगर | २९ सप्टेंबर | भैरवनाथ वाकळे

ahmednagar news मराठी साहित्य व विचारधारा प्रगल्भ झाली ती साहित्यक्षेत्र व्यतिरिक्त लिहणाऱ्या माणसांमुळे. अर्शद शेख हे आर्किटेक्ट असून सामाजिक भान असलेल्या विषयावर लिहितात हिच महत्वाची बाब आहे. हे पुस्तक एका विचारी माणसाचे आहे. अर्शदनामाचा प्रकाशन समारंभ ही एक मैफिल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्यवस्थेला भिती असते विचार करणाऱ्या आणि वेगळा विचार मांडणाऱ्या माणसांची, असे प्रतिपादन पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

येथील प्रथितयश आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या ‘अर्शदनामा’ पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते आणि पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रम सीएसआरडी सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर अशोक सब्बन, प्रा. डॉ. महेबुब सय्यद, डॉ. प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

अध्यक्षीय भाषणात संजय आवटे पुढे म्हणाले, हे पुस्तक आपला वारसा काय आणि आरसा काय हे सांगते त्याचप्रमाणे ‘आयडिया ऑफ इंडिया’ अधोरेखित करते. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुढचे पाऊल म्हणजे हे पुस्तक. यात आजच्या आणि उद्याच्या भारताचा शोध घेतलेला आहे.

यावेळी त्यांनी रिझर्व बँकेचे सल्लागार तथा अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे यांच्यासोबत झालेली चर्चा सांगितली. विकास म्हणजे काय तर, ज्या ठिकाणचे अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी आपण डोळे झाकून पिऊ शकतो, सार्वजनिक शाळेत आपल्या बालकांचा प्रवेश घेऊ शकतो, आपल्या नातेवाईकाला सार्वजनिक दवाखान्यात एडमिट करू शकतो अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा असे श्रीमंतांनीही वाटते त्याला विकास म्हणतात, अशी एका अर्थतज्ञाने सांगितलेली खरी व्याख्या त्यांनी सांगितली.

लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी अहमदनगर बळजबरीच्या नामांतराविषयी भुमिका व न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या नामांतराची गोष्ट आवर्जून सांगितली.

अहमदाबादचे नामांतर करण्याचा विषय आला त्यावेळी मुळ नाव न बदलता अहमदाबादशेजारी गांधीनगर नावाचे दुसरे स्मार्ट शहर वसविले. तसेच अहमदनगर शहराबाबत करता येईल. मुळ शहराशेजारी अहिल्यानगर नावाचे स्मार्ट शहर वसविले पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला चाँद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य अब्दुल कादिर, शहाशरीफ दर्ग्याचे विश्वस्त निजाम जहागिरदार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आण्णा सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक कळमकर, शहराचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर, युनूस तांबटकर, आनंद शितोळे, संध्या मेढे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, विजयसिंह होलम, सुधीर लंके, अशोक निंबाळकर, सॅम्युअल वाघमारे, प्रा.मुदस्सिर सय्यद, बाबा आरगडे, संतोष गायकवाड, तुषार सोनवणे, अतुल देठे, उबेद शेख, सुनिल गोसावी, राजेंद्र पवार, गिरीश धोत्रे, समीर आंबेकर, ॲड. शिवाजी आदमाने, डॉ. विजय कुमठेकर, राम गायकवाड, मोहन इंगळे, बापू चंदनशिवे, आसिफ सर, अतिक शेख, अनिस शेख, अब्दुल रहीम शेख, हबीबखान पठाण,
फिरोज तांबटकर, फिरोज पठाण, अफसर मिर्झा, आलमखान आदींसह शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment