Politics बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा व तालुका कार्यकारणी बैठकीत, श्रीगोंद्यातील उद्योगपती बाप्पू माने यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करत, पुरोगामी विचारधारेच्या आधारावर, आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकी लढवणार असल्याचे सांगितले. बहुजन समाजासाठी, विशेषतः सर्वसामान्य व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे, बहुजन समाज पार्टीच्या ध्येयधोरणाशी जुळणाऱ्या पुरोगामी चळवळीशी स्वतःला जोडत आगामी निवडणुकीत आमदारकीसाठी ताकतीने उभा राहणार आहे. जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन आमदारकीला निवडून देण्याचे समाज बांधवांना आव्हान करणार आहे.
बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी देखील आपले विचार मांडले. त्यांनी बहुजन समाज पार्टीचे ध्येय आणि उद्दिष्टे विशद करत, नवीन सदस्यांचे स्वागत केले व त्यांना सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.
या बैठकीत श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल म्हस्के, उपाध्यक्ष कानिफनाथ बर्डे, महासचिव संजय घोडके, कोषाध्यक्ष अशोक मोरे, नितीन जावळे, आबासाहेब रामफळे, अंबादास घोडके, सलीम अत्तार, भीमराव घोडके, बलभीम घोडके, स्वप्नील पवार, सुमन चव्हाण, संपत पवार, सत्यवान शिंदे, आणि संतोष काळे यांचा समावेश होता. उपस्थित सर्वांनी बाप्पू माने यांच्या विधानसभेच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यामुळे श्रीगोंद्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.