Politics शिरपूर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी घटक पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात आली. पक्षाच्या वतीने बुधा मला पावरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बुधा पावरा हे मलकानगर, पो. हिसाळे येथील रहिवाशी असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, नेते आहेत. अनेक आंदोलन, लढे, मोर्चे करत त्यांनी गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुरूंगवासही भोगला.
शिरपूर विधानसभा निवडणूक तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन तालुक्यात परिवर्तन करू व सत्तेचे झालेले केंद्रीकरण थांबून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही उमेदवार कॉम्रेड बुधा मला पावरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली. जनशक्तीच्या जोरावर धनशक्तीला मात देऊन परिवर्तन घडवून आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
ता.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता रामसिंग नगर, शिरपूर येथील संपर्क कार्यालयापासून रॅलीने समर्थक व महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, राज्य सहसचिव राजू देसले, जिल्हा सेक्रेटरी वसंत पाटील उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य ॲड. हिरालाल परदेशी, तालुका सेक्रेटरी ॲड. संतोष पाटील यांनी केले.