Business; कोणतीही खरेदी ऑनलाईन न करता प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी - यश शहा; सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहा यांचा सत्कार - Rayat Samachar
Ad image

Business; कोणतीही खरेदी ऑनलाईन न करता प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी – यश शहा; सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहा यांचा सत्कार

67 / 100

अहमदनगर | १५ सप्टेंबर | पंकज गुंदेचा

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती असलेल्या अभियंता दिनानिमित्त इंजि. यश प्रमोद शहा यांचा आर्किटेक्ट इंजिनियर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन संचालकपदी प्रथम पसंतीच्या सर्वात जास्त मतांनी निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शहा यांची सामाजिक कार्याची दखल घेत आरएसएस भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः भगवान महावीर २५५० निर्वाण कल्याणक महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या अहमदनगर जिल्हासमितीवर निवड केली. या निवडीबद्दल अहमदनगर सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन व कामधेनु गोसंवर्धन गोशाळेच्या वतीने अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. यश शहा यांचा पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन्स ॲण्ड इंटेरियर्स नावाने Business बांधकाम व्यवसाय आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यावेळी पै. शिवाजी चव्हाण म्हणाले, यश शहा हे कमी वयात चांगले सामाजिक कार्य करत आहेत तसेच व्यापारी बांधवांचे प्रश्न सरकारी स्तरावर शहा नेहमीच प्रभावीपणे मांडत असतात. तसेच सावेडी उपनगर असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक कार्यक्रमा सोबतच वर्षभर अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

शहा यांनी सत्काराबद्दल असोसिएशनच्या सदस्यांचे आभार मानले. अहमदनगरकरांना सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आवाहन केले की, येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी आपली खरेदी ऑनलाईन न करता प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी.

यावेळी सचिव प्रमोद डोळसे, उपाध्यक्ष पाअुलबुधे, संचालक सचिन बाफना, यश गांधी, रावसाहेब चव्हाण, शरद बोरुडे, गुंजाळ आदी सभासद उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment