Education: सृष्टी विजयकुमार पादिर हिने मिळविला मास्टर ऑफ आर्किटेक्टमधील मानाचा 'एक्सलेंस अवॉर्ड' - Rayat Samachar

Education: सृष्टी विजयकुमार पादिर हिने मिळविला मास्टर ऑफ आर्किटेक्टमधील मानाचा ‘एक्सलेंस अवॉर्ड’

रयत समाचार वृत्तसेवा
79 / 100

पुणे | ६ सप्टेंबर | प्रतिनिधी

Education अहमदनगर येथील प्रथितयश इंजी.विजयकुमार पादिर यांची कनिष्ठ कन्या सृष्टी हिने मास्टर ऑफ आर्किटेक्चरमधील प्रतिष्ठेचा Excellence Award मिळवला. आर्किटेक्चर क्षेत्रात अपवादात्मक योगदानास, उत्कृष्ट शैक्षणिक, डिझाईनच्या कर्तृत्वासाठी हा पुरस्कार दिला जातो. यात तिचा अभिनव दृष्टिकोन दिसतो तसेच तिने थेसिस प्रोजेक्टमध्ये केलेले ‘आर्किटेक्चर विथ् अर्बन स्पेसेस’ तसेच सर्जनशीलता व वास्तविक उपयोगीता याचे कौतुक करण्यात आले.

 पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे संपन्न झाला. तिची दूरदर्शी कल्पना, वचनबद्धता हा भविष्यातील आर्थिक विकासासाठी नवीन बेंचमार्क आहे.

अधिक माहिती देताना सृष्टी हिने सांगितले, पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिमान वाटतो. या फील्डसाठी माझ्याकडे असलेल्या कठोर परिश्रम व सर्जनशीलतेचा हा पुरावा आहे. याक्षेत्रात मी सातत्याने योगदान देईल व टिकाऊ, नाविन्यपूर्ण डिझाइन्सने आदर्श निर्माण करेल.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment