अहमदनगर | २० ऑगस्ट | प्रतिनिधी
social रक्षाबंधन सणानिमित्त कानडे परिवाराच्या वतीने ‘पहिली राखी देशाच्या जवानांसाठी’ उपक्रम राबविण्यात आला. शहरातील एम.आय.आर.सी. सेंटर येथे सुरेखा कानडे यांनी सुखविरसिंह आणि परमजीतसिंह या सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. अनेक उत्सवाला देशाची सुरक्षा म्हणून घरी न येता सीमेवर उभे असणारे सैनिक यांचा त्याग मोठा आहे. आपण नागरिक म्हणून त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे.
आम्ही आपल्यासोबत आहोत आणि तुमच्या राष्ट्रनिष्ठेची जाणीव आहे. या भावनेने रक्षाबंधन साजरे केले असल्याचे भावना कानडे परिवाराने व्यक्त केली. यावेळी सुरेखा कानडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे, सोहम कानडे आदि उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा