shirdi:विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडुन येणार नाहीत - डॉ. राजेंद्र पिपाडा; गुन्हेगारीला शिर्डी मतदारसंघात प्रोत्साहन म्हणून जनतेच्या मनात संतापाची भावना - Rayat Samachar

shirdi:विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडुन येणार नाहीत – डॉ. राजेंद्र पिपाडा; गुन्हेगारीला शिर्डी मतदारसंघात प्रोत्साहन म्हणून जनतेच्या मनात संतापाची भावना

रयत समाचार वृत्तसेवा
71 / 100

अहमदनगर | प्रतिनिधी

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडुन येणार नाहीत असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुक लढवावी असा लोकांकडून आग्रह आहे. जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत आपण shirdi विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत. उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे मी या विधानसभा निवडणूकीत आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे, अशी माहिती भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे सर्व सत्ताकेंद्रे एकाच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. यापूर्वी आपण विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज देऊन ११ फेऱ्यांपर्यंत १३ हजार मतांनी पुढे होतो. विजयाच्या जवळ पोहोचलो होतो. त्यानंतरच्या निवडणुकीत मी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षशिस्त पाळली. हे लक्षात घेऊन आपणास येथून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांना भेटुन करणार आहोत. असेही डॉ. पिपाडा म्हणाले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जातो. जो विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असतो. त्याच्या विरोधात आपल्या बगलबच्च्यांना पत्रके काढायला लावली जातात. विरोधात उभा राहिलेला उमेदवार मॅनेज आहे अशी चर्चा करून बदनामी केली जाते. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की राजेंद्र पिपाडा कधीही मॅनेज झाले नाही आणि होणारही नाही. विरोधकांवर अॅट्रॉसिटी व विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात. मी न पाहिलेल्या जिल्ह्याबाहेरील माणसाने माझ्यावर अँट्रासिटीचा खोटा गुन्हा विरोधकांमार्फत दाखल केला होता. आमच्यावर जीवघेणे हल्लेही झाले होते. मात्र आपण या दडपशाहीस पूरून उरलो आहोत. विरोधकांवर हल्ले केले जातात. काहींवर तर हल्ले घडवून त्यांचे हात पाय मोडल्याच्या घटना यावर्षीच घडल्या आहेत. येथे दहशत आणि दडपशाही सुरु आहे. विरोधकांची अडवणुक करण्याचे आणि जिरवाजीरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानली जात आहे.

  शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रश्न वर्षानूवर्षे प्रलंबीत आहेत. गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. हि परिस्थीती आपण बदलू शकतो. हे राहाता पालिकेच्या माध्यमातून आपण दाखवून दिले. मोडकळीला आलेले गोदावरी कालवे, खड्ड्यात गेलेला शिर्डी – अहमदनगर रस्ता आणि ५५ वर्ष होवुनही निळवंडे कालव्याचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाही. या महत्वाच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दाखवीली जात नाही. साईसंस्थानच्या माध्यमातून रोजगार निर्मीतीला चालना देणारे प्रकल्प राबवीले जात नाहीत.

रोजगाराची साधने नसल्याने युवक बेरोजगार आहेत, शेतीला पाणी नसल्याने सामान्य शेतकरी आणि विकास ठप्प असल्याने जनता भरडली जात आहे. आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न व संवेदना आपल्याला समजतात. साईमंदिर परिसराचे दरवाजे सामान्य भाविकांसाठी का खुले केले जात नाहीत. असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत. गोदावरी कालव्यातून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाहीत. साईसंस्थान ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न. शिर्डी व परिसरात होणाऱ्या चोऱ्या व शिर्डी मतदारसंघात असलेली गुन्हेगारी व गुन्हेगारांना मिळणारे राजकीय पाठबळ, असे एक ना अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबीत आहेत. हे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो असा जनतेला विश्वास आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image

यापूर्वी आपण या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लढवीली. जोरदार झुंज दिली आणि विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो. आपला, थोड्या मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर देखील आपण जनतेसोबतचा संपर्क कायम ठेवला. राहाता शहरवासीयांनी आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पालिकेत २ वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन पत्नी ममता पिपाडा यांना राहात्याच्या जनतेने निवडुन दिले. आमच्या काळात सर्वसामान्य लोकांना सन्मानाने वागणुक देवुन त्यांची विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. एक मॉडेल म्हणून राहाता शहराचा विकास केला. विरभद्र मंदिरासमोरी अतिक्रमणे काढून बाजारतळाचे कॉक्रीटीकरण केले. राज्यातील एक स्वच्छ, सुंदर व अद्ययावत स्मशानभुमी विकसित केली. राहाता शहराची पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्ण केली. वाड्या वस्त्यावरील रस्त्यांची कामे केली. साई संस्थानच्या ५९८ कामगारांचा प्रश्नासाठी गेल्या २ वर्षापासुन आम्ही प्रयत्न करीत असून हा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा आहे.

साई संस्थानच्या वतीने अद्ययावत कॅन्सर उपचार रूग्णालय तसेच बींग वार्ड सुरू व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत. साईसंस्थानच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी मेडीकल व इंजिनियरींग कॉलेज झाले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डीत गुन्हेगारांना धाक राहीलेला नाही. भाविकांच्या गळ्यातील दागीन्यांची राजरोस चोरी होते. दुचाकी आणि चार चाकी वाहने चोरीला जातात. वाहतुक पोलीस भाविकांच्या गाड्या अडवून त्यांना अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करतात. संपुर्ण भारतातुन साईभक्त हे शिर्डीत येत असतात परंतु महामार्ग वाहतुक पोलिसांकडुन परराज्यातील वाहनांची अडवणुक करुन त्यांच्याकडून आव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केली जाते. हे कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे हे सामान्य जनतेला ठाऊक आहे.

प्रस्थापितांमार्फत गुन्हेगारीला शिर्डी मतदार संघात प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. काही जणांनी साईबाबा संस्थानच्या मंदिर परिसराचे दरवाजे २ वर्षापासुन बंद ठेवायला भाग पाडले. आपले सरकार असतानाही ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते हे योग्य आहे का? यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते याला जबाबदार कोण? साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंद करायला त्यांनीच सांगायचे आणि समिती नेमायला देखील त्यांनीच आदेश द्यायचे. ही दुटप्पी भूमिका शेतकरी व फुल विक्रेत्यांच्या लक्षात आली आहे. गुलाबाची व इतर फुल उत्पादक शेतकरी आणि दुकानदार व छोटे विक्रेते हैराण झाले आहेत.

आपण सामान्य जनतेची कामे करण्यासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे आपण स्पर्धेत आहोत. ‘हक्काचा माणूस, आपल्या हक्कासाठी’ हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणीत आहोत. जनतेच्या मनातील उमेदवार या नात्याने आपण येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी वरिष्ठ नेत्यांना भेटुन मागणार आहोत. अशी माहिती डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- Advertisement -
Ad image
Share This Article
Leave a comment